Anupan Kher on Ram mandir : ‘जेव्हा महिलांवर मंदिर परिसरात अत्याचार..’; मुघलांचा उल्लेख करत अनुपम खेर यांचा राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रतिक्रिया म्हणाले…


Anupam Kher on Ram Mandir: राममंदिर देणगी (Ayodhya Ram mandir) चोरी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.  मंदिराच्या दानपेटीमधून (Anupam Kher) लाखो रुपयांची चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाने  कारवाई करत  काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (Entertainment) आहेत. तपासादरम्यान, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकीय तसेच लोकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे.  अभिनेता अनुपम खेर यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.  त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, राम मंदिराच्या चोरीपेक्षा इतिहासात हिंदूंवर झालेले अत्याचार ही मोठी समस्या आहे, असं म्हटलं आहे. अनुपम खेर यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलं? पाहूयात.

राम मंदिर प्रकरणावर अनुपम खेर नेमकं काय म्हणाले? (Anupam Kher on Ram Mandir)

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी राम मंदिरावर भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे ते प्रचंड ट्रोल होत आहेत. अनुपम खेर व्हिडीओत म्हणाले की, ‘लोक या गोष्टीचा बाऊ करत आहेत.  म्हणतायेत, मंदिरात चोरी झाली, अशा शब्दांचा वापर करत आहेत. मंदिरात खरी लूट तेव्हा झाली, जेव्हा मुघल आक्रमकांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती. ब्राह्मणांची हत्या करण्यात आली, त्यांची जानवे गोळा करण्यात आले होते.  तेव्हा मंदिर लुटली गेली होती. मंदिरांतील मौल्यवान वस्तू लुटल्या गेल्या, तेव्हा मंदिरात लुट झाली होती. जेव्हा मंदिराच्या आवारात महिलांवर  अत्याचार झाले,  तेव्हा मंदिरे लुटली गेली होती’.

 

‘ही एक मोठी समस्या होती. जर आपण यात मात करु शकलो, तर ही चोरी एक खूप छोटी गोष्ट आहे’, असं अनुपम खेर म्हणाले. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी कमेंट सेक्शनमधून अनुपम खेर यांना प्रचंड ट्रोल केलं आहे. एकाने कमेंटमध्ये ‘वाह…काय जबरदस्त तर्क लावला आहे. एखाद्या वेळेस चित्रपट फ्लॉप झाला तर,  पटकथेला नाही तर तिकीट काऊंटरला दोष द्या’, असं एकाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रविवारी 4 चित्रपटांमध्ये महासंग्राम! ‘वेलकम टू ग जंगल’ आणि ‘धमाल 4’ या सिनेमांनी किती कोटी कमावले? कोणता सिनेमा आघाडीवर?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *