घाणेरडं बोलायचं असेल तर…, हॉल्टरनेक ब्लाउजवर स्पृहा जोशीने अखेर सोडलं मौन – Marathi News | Mrathi actress Spruha Joshi on Trolling negative comments on holterneck blouse


Spruha Joshi on Trolling : अभिनेत्री स्पृहा जोशी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली आणि तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. स्पृहा विशेषतः तिच्या आवाजमुळे, बोलण्याच्या अनोख्य पद्धतीमुळे आणि अभिनयामुळे अळखली जाते. एवढंच नाहीतर, संकर्षण via स्पृहा या कवितांच्या कार्यक्रमामुळे देखील स्पृहा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील स्पृहा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 10 वर्षांपूर्वी स्पृहा हिला ट्रोल करण्यात आलेलं. हॉल्टरनेक ब्लाउज घातल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलेलं. यावर अखेर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्पृहा हिने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, हॉल्टरनेक ब्लाउज घातल्यामुळे मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. माझ्या हॉल्टरनेक ब्लाउजची बातमी न्यूजपेपरमध्ये देखील छापून आलेली. चकित करणारी गोष्ट म्हणजे, त्या फोटोमध्ये आक्षेपार्ह असं काहीही नव्हतं तरी देखील मला ट्रोल करण्यात आलं होतं.’

‘मी 10 वर्षांपूर्वी हॉल्टरनेक ब्लाउज घातलेला आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटो पाहिल्यानंतर लोकांनी मला इतकं ट्रोल केलं की, बातमी न्यूजपेपरमध्ये देखील छापून आलेली. त्या फोटोमध्ये काहीच नव्हतं. काही असतं आणि ट्रोल केलं असतं, तर काही हरकत नव्हती. पण तरी देखील मला ट्रोल करण्यात आलं.’

पुढे स्पृहा म्हणाली, ‘मासा खाताना, खेकडा खाताना फोटो पोस्ट केला, त्यामुळे देखील मी ट्रोल केलं. पण एकाही नकारात्मक कमेंटला उत्तर दिलं नाही. मी माझी शक्ती अशी का खर्च करू? ट्रोलिंगचं प्रमाण फार वाढलं आहे. मी आता ट्रोल करणाऱ्यांना हाईड करते, नाही तर त्या व्यक्तीला ब्लॉक करते. माझ्या सोशल मीडियावर माझे किती फॉलोअर्स याचा मला काहीच फरत पडत नाही.

‘चांगलं बोलायचं असेल तर वेलकम. घाणेरडं बोलायचं असेल तर येऊच नका. मी काय खायचं, काय घालायचं.. हे मला अनोळखी लोकांनी सांगण्याची काहीही गरज नाही. मला बोलण्याचा अधिकार मी फक्त माझ्या कुटुंबियांना दिला आहे.’ असं देखील स्पृहा म्हणाली. स्पृहा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात रहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःच् फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *