Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर (Jantar Mantar) मैदानावर सोनम वांगचूक यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. या उपोषणाला 16 दिवस झाल्यानंतर आता सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करत 20 तारखेच्या दिल्लीतील आंदोलनाला देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. (sonam wangchuk agitation)
मी काही दिवसांपूर्वी सोनम वांगचूक यांना फोन करुन यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तुम्ही प्राणांतिक उपोषण करु नका, या सरकारला काही देणेघेणे पडलेले नाही, असे त्यांना सांगितले. पण ते म्हणाले की, ‘पण ते म्हणाले,मेरा कुछ भी होने दो, देश का भला होना चाहिए.’ अशा व्यक्तीसमोर काय बोलायचे. हे सरकार असंवेदनशील आहे. याविरोधात 20 तारखेला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला देशातील सर्व खासदारांनी उपस्थित राहावे. माणुसकी शिल्लक असेल तर भाजपमधील खासदारांनीही आंदोलनाला आले पाहिजे. हा देशातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आजचा विषय महिनाभर चालू आहे. दिल्लीत जंतरमंतर येथे अभिजीत दिपके यांनी हा विषय उचलला आणि आंदोलन सुरु केले. हा तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटले, आत्महत्या केल्या कोणी लक्ष दिलं नाही, सरकारला वेळ नाही. इतर पक्षांच्या फोडाफोडीत जास्त रस आहे. देशाचं नशीब फुटत आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सोनम वांगचूक यांच्या बुद्धिमत्तेचा आपण आदर केला पाहिजे. पण त्यांनाच देशद्रोही ठरवले जात आहे. त्यांच्या उपोषणाला 16 दिवस झाले तरी केंद्र सरकारला तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा व्यक्ती एक-एक करुन जाव्यात, हेच सरकारला हवे आहे. सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे देशातील सगळ्या पक्षांनी आता एकत्र आले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
Uddhav Thackeray: जंतरमंतरवर गुंड सोडून हिंसाचार माजवून आंदोलन उधाळण्याचा डाव: उद्धव ठाकरे
अभिजीत दिपके देशातील युवकांचा आवाज उठवत आहे. हे युवक सुशिक्षित आहेत. 20 तारखेला मोर्चा आहे, त्याच्याआधी काही गुंड सोडून हिंसाचार माजवून आंदोलन उधाळण्याचा डाव आहे. केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे. देशातील युवकांनी नाहीतर पालकांनीही जागे झाले पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही, देशाचा आहे. अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा सुषमा स्वराज यांनी भाषण केले होते. तेव्हा चर्चेला विलासराव देशमुख गेले होते. एखाद्या व्यक्तीकडून काम होत नसेल त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेऊन त्याठिकाणी सक्षम व्यक्तीची नेमणूक केली तर गैर काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से