Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी नशीबाचे दार उघडणार! जुलैच्या नव्या आठवड्यात आर्थिक प्रगती, प्रेम, नोकरीत ‘हे’ मोठे बदल; साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 13 To 19 July 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा नवा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा तिसरा तसेच नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – जुलैच्या या आठवड्यात जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

करिअर (Career) – कामाच्या बाबतीत नवीन आठवडा तुमच्यासाठी ग्रेट असणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील.

आर्थिक स्थिती (Wealth) – तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळा.

आरोग्य (Health) – आरोग्याच्या बाबतीत नवीन आठवडा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर भर द्या.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासपूर्ण बनेल. कुटुंबातील एखाद्या शुभकार्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांच्या विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवल्यास नाते अधिक दृढ होईल.

करिअर (Career) – वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा भागीदारीचा लाभ मिळेल. कला, शिक्षण, बँकिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळू शकते.

आर्थिक स्थिती (Wealth) – उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वीची गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. घर, वाहन किंवा कुटुंबासाठी खर्च होईल, पण आर्थिक संतुलन कायम राहील. बचतीकडे लक्ष द्या.

आरोग्य (Wealth) – तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. बाहेरचे तेलकट पदार्थ टाळा. योग आणि हलका व्यायाम लाभदायक ठरेल.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *