Saif Ali Khan: ‘तू हा सीन न्यूड होऊन…’, 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘या’ सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला…


Saif Ali Khan on Omkara Movie Scene: अभिनेता सैफ अली खानचा ‘ओमकारा’ हा सिनेमा आवर्जून  पाहिला जातो.  या सिनेमाला प्रदर्शित होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.  आजही  या सिनेमाला भारतातील जबरदस्त सिनेमांपैकी मानले जाते.  या सिनेमात अजय देवगणची मुख्य भूमिका होती.   पण सिनेमात लंगडा त्यागी अर्थात सैफ अली खानची भूमिका प्रचंड गाजली. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत  सैफ अली खानने  या सिनेमाच्या संबंधित एक किस्सा शेअर केला. हा किस्सा ऐकून अनेकांना शॉक बसला. 

नुकतंच एका वेब पोर्ट्लला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने या फिल्मच्या संबंधित एक किस्सा शेअर केला. या सिनेमाच्या एका सीनमध्ये दिग्दर्शिक’विशाल भारद्वाज’ यांनी सैफ अली  खानला एक सीन कपड्यांशिवाय करु शकाल का?  असा प्रश्न विचारला.  हा सीन करण्यास सैफ अली खानने थेट नकार दिला.  सैफ अली खान म्हणाला, ‘एक खूप मोठा सीन होता.  मी आरशासमोर उभा होतो.  विशालजी मला म्हणाले की, तू हा सीन नग्न अवस्थेत करु शकशील का?’.

20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘ओमकारा’ सिनेमातील सैफ अली खानने एक जुना किस्सा शेअर केला (Saif Ali Khan On Omkara Movie)

‘मला ही आयडिया थोडी हटके वाटली.  पण सेटवर बरेच लोक उपस्थित होती. त्यामुळे मी थोडा संकोच करत होतो.  त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की, ‘जर तुम्ही नग्न होऊन मला डायरेक्ट केलं तर, मी देखील हा सीन करेन’, असं म्हणालो.  यावर विशालजी हसले. ते, ‘मी हे नाही करणार’, असं म्हणाले. बस इतकंच झालं’, असं सैफ अली खानने सांगितलं.

सैफ अली खानला, आता असं वाटतं की, तो सीन करायला हवा होता.  सैफ  अली खान म्हणाला, ‘आता मी मागे वळून पाहतो तर,  मला असं वाटतं की, त्यावेळेस हा सीन शूट करताना मला त्रास झाला नसता. जर ती सावली, मागून शूट केली असती तर कदाचित तो सीन अधिक जबरदस्त झाला असता.  त्यावेळेस आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो. जर या प्रकारचा सीन मला आज करायला मिळेल तर मी नक्की करेन’, असंही सैफ अली खान म्हणाला.

‘या सीनमध्ये पहिले खूप मोठा डायलॉग होता.  यात पात्र आपल्या सुडाबद्दल  भाष्य करतो. मात्र,  शूटिंगच्या काही वेळापूर्वी विशाल भारद्वाज यांनी संपूर्ण सीन बदलला’, असंही , सैफ अली खान म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘जर चांगली स्टोरी असेल…’ प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ‘सैराट’चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *