Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी


Cricket Legend Sandeep Patil on Maharashtrachi Hasyajatra Show:  सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो (Comedy Show) प्रचंड चर्चेत आहे. या शोमधील स्किट्स आणि कलाकारांचे सादरीकरण, या दोन्ही गोष्टींना प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने यांच्या दमदार परफॉर्मेन्समुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. यांसह या शोमधील इतर कलाकारही या शोमुळे  प्रसिद्धीझोतात आले. या कॉमेडी शोने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. केवळ सर्वसामान्य नाही तर, सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूही या  कार्यक्रमाचे मोठे चाहते आहेत. येत्या सोमवारी या कॉमेडी शोमध्ये अशी एक व्यक्तिमत्व येणार आहे, ज्यांनी  क्रिकेट विश्वात नाव कमावलं. 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भारतीय क्रिकेटपटूची एन्ट्री (Cricketer Sandeep Patil on Maharashtra Chi Hasyajatra)

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये  भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज माजी क्रिकेटपटू संदीप पाटील पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.  तसेच त्यांच्यासह संदीप पाटील यांचे पुत्र आणि अभिनेते चिराग पाटील, यांसह त्यांची नात रियाना पाटील विशेष पाहुणे  म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.  येत्या सोमवारच्या विशेष भागात नवीन पाहुणे मंडळी या शोचा मनभरुन आनंद लुटणार, एवढं मात्र नक्की.

एका कॉमेडी शोमधून तीन पिढ्या एकत्र येत असल्यामुळे प्रेक्षकांचीही हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचं कौतुक करताना  संदीप पाटील म्हणाले, ‘बऱ्याच दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये येण्याची इच्छा होती.  हा कार्यक्रम आम्ही नियमितपणे पाहतो. काही स्किट्स मला इतक्या आवडल्या की, मी त्या वारंवार पाहतो’.

‘काही मराठी कळत नसलेले माझे काही क्रिकेटपटू मित्रही हा शो आवर्जून पाहतात.  हा शो भाषेच्याही पलिकडे गेला आहे.  हा कार्यक्रम आपल्याला मनापासून हसवतो’, असं त्यांनी म्हणत त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केलं.   दरम्यान, तीन पिढ्यांना एकाच शोमध्ये एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘वेलकम टू द जंगल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *