नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळल्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी टीम इंडियाला वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयांक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).
🚨 News 🚨#TeamIndia squad announced for the 3️⃣-match T20I series against Zimbabwe.
More Details ▶️ https://t.co/sC19D5eW8y#ZIMvIND pic.twitter.com/ctbM5gFMtY
— BCCI (@BCCI) July 6, 2026
भारत आणि झिम्बाब्वे टी 20 मालिका वेळापत्रक
पहिली टी 20 मॅच : 23 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 25 जुलै
तिसरी टी 20 मॅच : 26 जुलै
संजू सॅमसनला वगळलं
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसनला आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यात आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नव्हती. तर, दुसऱ्या टी 20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली आणि संजू सॅमसनला वगळण्यात आलं होतं. आता झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेतून संजू सॅमनसला वगळण्यात आलं आहे.
रिंकू सिंगचं कमबॅक
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रिंकू सिंगला संघात पुन्हा संधी देण्यात आली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात रिंकूला संधी देण्यात आली नव्हती.
प्रभासिमरन सिंगला संधी
आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर ज्या पंजाब किंग्जचा कर्णधार आहे, त्या संघातील प्रभासिमरन सिंगला संघात स्थान मिळालं आहे. दुसरा विकेटकीपर म्हणून त्याला स्थान देण्यात आलं आहे.
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा अपडेटेड संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, शिवम दुबे
दरम्यान, नितीश कुमार रेड्डीच्या जागी शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आलं आहे.