Solapur Malshiras Crime News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात धक्कादायक (Solapur Malshiras Crime ) घटना घडली आहे. अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील चौंडेश्वरवाडी या गावात दिवसाढवळ्या एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना (Shooting at a woman) घडली आहे. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. उषा विजय साठे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मयत महिला ही शेतामध्ये काम करत होती. यावेळी सचिन देशमुख हा व्यक्ती तिथे आली आणि त्याने गोळी घालून महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेचा तपास अकलूज पोलीस ठाणे करत आहे.
नेमका गोळीबार का केला? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही
माळशिरस तालुक्यात धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. चौंडेश्वरवाडी या गावात दिवसाढवळ्या एका महिलेवर गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. नेमका गोळीबार का केला? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अकलूजचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन कार चालकाचा दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला
नाशिक जिल्ह्यातील मनमाड (Manmad) शहरातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना (Crime News) समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या एका अतिशय किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या मुजोर कार चालकाने दुचाकीस्वाराच्या पोटात थेट चाकूने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
इरफात बेग असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. इरफात हा आपल्या दुचाकीवरून मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंपाजवळून जात होता. याच वेळी येवल्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या एका कारचा इरफातच्या दुचाकीला कट लागला. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इरफातने कार चालकाला अडवले. मात्र, कार चालकाला याचा इतका राग आला की, त्याने कसलाही विचार न करता थेट चाकू काढला आणि इरफातच्या पोटात खुपसला.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना