ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा


England Playing 11 For 3rd T20I नॉटिंघम : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. तर, दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला. 7 जुलै रोजी दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना होणार आहे.  हा सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजवर होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग इलेव्हन जारी करण्यात आली आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्त्वात इंग्लंडनं मालिकेत वर्चस्व ठेवलं आहे.

तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला इंग्लंडनं पुन्हा संधी दिली आहे. इंग्लडनं भारताला दुसऱ्या टी 20 सामन्यात 4 विकेटनं पराभूत केलं होतं. 

तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी इंग्लंडचा संघ 

फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बॅथल, टॉम बँटन, सॅम कर्रन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग. 

टीम इंडियाला पहिल्या विजयाची आशा

भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आयर्लंड विरोधातील मालिका गमवावी लागली. यानंतर इंग्लंड सोबत पाच टी 20 सामन्यांची मालिका सोबत सुरु झाली आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द झाला तर दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा 4 विकेटनं पराभव झाला. आता तिसऱ्या टी 20 सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. 

श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं नेतृत्त्व स्वीकारल्यापासून भारतानं अद्याप एकाही टी 20 सामन्यात विजय मिळवलेला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला आयर्लंड विरोधातील मालिका गमवावी लागली. ती श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील पहिली मालिका होती. आता दुसरी मालिका इंग्लंड सोबत सुरु आहे.  

मालिकेत इंग्लंड आघाडीवर

इंग्लंडनं भारतावर दुसऱ्या मॅचमध्ये 4 विकेटनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला या मालिकेत विजय मिळवायचा असल्यास तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. तिसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास 1-1 अशी बरोबरी साधली जाईल.  

भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, सूर्यांश शेडगे, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *