Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या ‘अल्फा’ ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..


Huma Kureshi: अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बेबी डू डाई डू’ आणि यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा महिलाप्रधान ॲक्शनपट ‘बेबी डू डाई डू’ अलीकडेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत ‘अल्फा’शी होतेय. या स्पर्धेवर दिलेली तिची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. सध्या महिलाकेंद्रित ॲक्शनपटांसाठी हा सकारात्मक काळ आहे. प्रेक्षकांना आता दमदार महिला व्यक्तिरेखांवर आधारित अनेक चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. असं ती म्हणाली. न्यूड सीन बाबतीतही तिने स्पष्ट भूमिका घेतली.

बोल्ड – न्यूड दृश्यांवरून हुमा म्हणाली..

दुसरीकडे, हुमा दक्षिणेतील सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटाचाही भाग आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील आणि यशच्या काही दृश्यांवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादावरही तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. तिच्या संपूर्ण करिअरमध्ये ती कधीही न्यूड सीन करणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. तिचा वक्तव्याची सध्या चर्चा आहे.हुमा म्हणाली की, कोणत्याही चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच न्याय देणे योग्य नाही. प्रेक्षकांनी आधी संपूर्ण चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच मत व्यक्त करावे. अपूर्ण माहितीच्या आधारे एखाद्या चित्रपटाबद्दल किंवा कलाकारांबद्दल निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही तिने सांगितले.

न्यूड सीनबाबत हुमा कुरेशी म्हणाली .. 

हुमा कुरेशीने  स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ती तिच्या कारकिर्दीत कधीही न्यूड सीन करणार नाही.या निर्णयामागील कारण सांगताना हुमा म्हणाली, “माझे वडील आहेत, भाऊ आहेत आणि माझं कुटुंब आहे. त्यांना लाज वाटेल असं कोणतंही काम मला करायचं नाही.”मात्र, इतर कलाकारांच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचेही तिने म्हटलं.”अनेक कलाकार न्यूड सीन करतात आणि त्यात ते सहज असतात. त्यांच्या निर्णयाचा मी आदर करते. मात्र, वैयक्तिक बोलायचं झालं तर तो माझा निर्णय नाही,” असे हुमा म्हणाली. हुमा कुरेशीच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *