मुंबई ‘लोकल’चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका


पालघर: वसई-विरारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rain) कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर वसई-विरार (Vasai) महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. महानगरपालिकेचे केंद्र अधिकारी जयेश चिपळूणकर आणि त्यांच्या पथकाने पूरग्रस्त भागात धाव घेत 15 अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी 50 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दुसरीकडे पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा (Local) सध्या केवळ वसई स्थानकापर्यंत सुरू असल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकात अडकून पडले आहेत. या प्रवाशांची, चाकरमान्यांना आता वसईतच रात्र काढवी लागणार असल्याचं दिसून येत आहे. 

वसई-विरार महापालिकेच्या प्रयत्नातून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात महापालिकेच्या पथकाने वेळेत केलेल्या बचावकार्यातून अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच भाग म्हणून पथकाने पूरग्रस्त भागात धाव घेत 15 अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी 50 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. प्रशासनाकडून सातत्याने पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे लोकलचा खोळंबा झाला असून विरार आणि नालासोपाराकडे जाणारे चाकरमानी, प्रवासी विरार स्थानकातच अडकून पडले आहेत. 

दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्र झाली असली तरी वसई-विरारकरांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा सध्या केवळ वसई स्थानकापर्यंत सुरू असल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकात अडकून पडले आहेत. वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवाही बंद असून केवळ एका खासगी ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असून त्यांच्याकडूनही नागरिकांकडे अमाप पैशांची मागणी केली जात आहे.  

रिक्षासेवाही बंद, लाईटही गेली, वसई अंधारात

पावसामुळे येथील रिक्षा सेवा, महानगरपालिका परिवहन बस आणि एसटी सेवा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांसमोर घरी पोहोचण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. नालासोपारा आणि विरारला कसे जायचे, असा प्रश्न प्रवाशांना पडला असून काही नागरिक ट्रॅक्टरच्या साहाय्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ट्रॅक्टरची सेवाही मर्यादित अंतरापर्यंतच उपलब्ध असल्याने त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. इन्व्हर्टरची बॅटरी संपली असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. खाण्यापिण्याचीही गैरसोय निर्माण झाली असून अत्यावश्यक वस्तूंची टंचाई जाणवत आहे. वाहतूक, वीज, पाणी आणि अन्न या मूलभूत सुविधांवर परिणाम झाल्याने वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, प्रशासनाला याचं सोयरसुतक सुतक नाही, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मंडळी हे सध्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत. 

हेही वाचा

मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी ‘चर्चा’ होणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *