Nashik TCS Conversion Case: TCS प्रकरणातील आरोपी निधा खान बाहेर येणार, अखेर जामीन मंजूर | नाशिक बातम्या (Nashik News)


Last Updated:

अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रकार देशातील प्रतिष्ठीत TSC अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

News18
News18

नाशिक : कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना कशा प्रकारे अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रकार होतो आणि तेही देशातील प्रतिष्ठीत TSC अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातली संशयित आरोपी पैकी एक असलेल्या निधा खान हिला अखेर दिलासा मिळाला आहे. निधा खान हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर दानिश शेख याचा जामीन फेटाळला आहे.

टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी मागील काही दिवसांपासून सगळे आरोपी हे नाशिकच्या जेलमध्ये मुक्कामी आहे.  संशयित आरोपी निधा खान हिला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. पण, यावेळी न्यायालयाने निधा खानला जामीन मंजूर केला आहे. तर  निदा खानसह तौसीफ अत्तार याला देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण,   दानिश शेख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.  मागील आठवड्यात आरोपींनी जामिनासाठी प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी जामीन फेटाळला होता. या प्रकरणी एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, अश्विनी चेनानी आणि रजा मेमन या आरोपींचा जामी फेटाळला होता.

निधाकडून धक्कादायक कबुली

दरम्यान,  टीसीएसमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.   “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर प्रशिक्षण दिले होते” अशी कबुली निधाने चौकशीत दिली.  तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे  दाखल झाले आहे.   सर्व गुन्हा संदर्भात नाशिक पोलिसांनी दोषारोप पत्र देखील दाखल केलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *