आमिर खान याचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबत झालं होतं. आमिरसोबत लग्न रीनाच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. म्हणून दोघांनी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल खुद्द आमिर याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. स्पेशल मॅरिड एक्ट अंतर्गत दोघांनी लग्न केलं.
आमिर याने असं देखील सांगितलं होतं की, 21 वर्षांनंतर 1986 मध्ये अभिनेत्याने 18 एप्रिल रोजी रीना दत्ता हिच्यासोबत कोर्ट मॅरिज केलं. या लग्नाबद्दल कोणालाच काहीच माहिती नव्हतं… लग्नानंतर दोघे त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले.
पण रीना यांची बहीण अनू हिने दोघांच्या लग्नाबद्दल कुटुंबियांना सर्वकाही सांगितलं आणि आमिर – रीना यांच्या लग्नाबद्दल सर्वांना कळलं… तेव्हा रीनाच्या आई -वडिलांना मोठा धक्का बसला. हे ऐकल्यानंतर रीनाच्या वडिलांना तर हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर आमिर याने देखील त्याच्या कुटुंबियांना सर्वकाही सांगितलं.
लग्नाबद्दल समजताच आमीरची आई आणि बहिणींना रडू कोसळलं. मात्र, भावुक झालेल्या त्याच्या वडिलांनी त्याला मिठी मारली आणि विचारलं की, आता लग्न झालंच आहे तर अडचण काय आहे. त्यानंतर, त्या अभिनेत्याचे कुटुंबीय रीनाचे आई-वडील यांची समजूत काढण्यासाठी गेले. सुरुवातीला तिच्या आईने त्यांना भेटण्यास नकार दिला, पण कालांतराने परिस्थिती हळूहळू निवळली.
रीना आणि आमिर यांनी गुपचूप लग्न तर केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिला घटस्फोट घेतल्यानंतर आमिर याने किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्याचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. आता वयाच्या 61 व्या वर्षी आमिर तिसऱ्यांदा लग्न करत आहे. गौरी हिच्यासोबत अभिनेता नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.




