Shraddha Kapoors Eetha: ‘ईठा’बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार ‘ही’ भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम


Bhojpuri star Akshara Singh in Eetha: श्रद्धा कपूरचा (Shraddha kapoor) ‘ईठा’ (Eetha) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. ‘ईठा’ या सिनेमातून श्रद्धा कपूरचा (Entertainment) जबरदस्त आणि कधी न पाहिलेला अवतार पाहायला मिळाला. सध्या या सिनेमातील अनेक गोष्टी रिव्हिल होत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘ईठा’ या सिनेमाच्या शीर्षकाचा विरोध करण्यात येत होता. दरम्यान,  आता या सिनेमाच्या शीर्षकाला हिरवा कंदील देण्यात आला आहे.  दरम्यान, या  सिनेमाच्या स्टारकास्टबाबत माहिती समोर आली आहे.  या सिनेमात भोजपूरी सिनेमा अॅक्टर अक्षरा सिंह हिची ‘ईठा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. अक्षरा नेमकी आहे तरी कोण? पाहूयात. 

भोजपूरी सिनेमा स्टार अक्षरा सिंह सध्या  आपलं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.  अलिकडेच अभिनेत्री ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातील एका गाण्यात झळकली. या गाण्यासाठी तिचं विशेष कौतुक करण्यात आलं. सध्या अभिनेत्री लवकरच ‘इठा’ सिनेमात झलकणार आहे. अभिनेत्री लवकरच  श्रद्धाकपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अक्षराने अलिकडेच शेअर केलेल्या व्हिडीओतून याची हिंट दिली आहे.  अक्षराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

भोजपुरी अभिनेत्रीचा ‘ईठा’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण (Bhojpuri star Akshara Singh will be seen in Eetha)

अक्षराने शेअर केलेल्या व्हिडीओत, तिने यात ‘ईठा’ सिनेमातील एन्ट्री आणि श्रद्धा कपूरसोबत काम करण्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.  अक्षराचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   तिला पापाराझींनी ‘ईठा’ आणि श्रद्धा कपूरवर प्रश्न विचारण्यात आला.  यावर अक्षरा म्हणाली, ‘श्रद्धा कपूरसोबत ‘ईठा’ हा सिनेमा येत आहे .  ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. श्रद्धाची प्रशंसा करावी तितकी कमी आहे’, असं अभिनेत्री म्हणाली.  यानंतर अभिनेत्रीला तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता,  अभिनेत्री म्हणाली, ‘मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. हे एक सरप्राइज आहे. आणि ते सरप्राइज सरप्राइजच राहुद्या’, असं अभिनेत्री म्हणाली. 

‘आता तुम्हाला याबद्दल सगळं सांगितलं तर,  तुम्हाला याबद्दल काहीच उत्सुकता राहणार नाही. थोडी एक्साईटमेंट हवी. काही गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं आहे’, असंही अक्षरा पापाराझींसमोर म्हणाली. दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित  ‘ईठा’ हा श्रद्धा कपूरचा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,  या सिनेमात तिनं तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *