ऐश्वर्या रायच्या ऑनस्क्रीन BF ला मोठा धक्का! अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने चालवला बुल्डोझर | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

एका शासकीय मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध अभिनेत्याच्या बंगल्याबाहेरील बांधकामावर प्रशासनाने हातोडा चालवला आहे. या कारवाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

News18
News18

बॉलिवूडमध्ये ‘माचिस’ आणि ‘जोश’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता चंद्रचूड सिंह सध्या एका अतिशय धक्कादायक कारणामुळे चर्चेत आला आहे. पडद्यावर विलनशी दोन हात करणाऱ्या या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यात भूकंप आला आहे. गुरुग्राममधील अलिशान डीएलएफ भागात सुरू असलेल्या एका मोठ्या शासकीय मोहिमेअंतर्गत चंद्रचूड सिंह यांच्या बंगल्याबाहेरील बांधकामावर प्रशासनाने थेट हातोडा चालवला आहे. या कारवाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने चालवला हातोडा

ही धडक कारवाई गुरुग्रामच्या हायप्रोफाइल डीएलएफ फेज-१ भागात पार पडली. चंद्रचूड सिंह यांच्या घराबाहेर बेकायदेशीरपणे करण्यात आलेलं बांधकाम पाडण्यासाठी नगररचना विभागाचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तासह धडकले. घराबाहेर बुलडोझरचा मोठा आवाज ऐकून स्वतः चंद्रचूड सिंह बाहेर आले. यावेळी त्यांनी तिथले मुख्य अधिकारी अमित मधौलिया यांची भेट घेतली.

घराबाहेर पडण्यात येत असलेल्या भिंती पाहून चंद्रचूड यांनी अत्यंत चिंतेने अधिकाऱ्यांना विचारलं, “कारवाई फक्त घराच्या बाहेरच्या बेकायदेशीर भागावर होणार आहे की तुम्ही घराच्या आतही काही तोडफोड करणार आहात?” त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करत स्पष्ट केलं की, “आम्ही फक्त नियमानुसार काम करत आहोत. जेवढा भाग परवानग्या न घेता बेकायदेशीरपणे बांधला गेला आहे, तितकाच भाग पाडला जाईल.” सुदैवाने, इतर लोकांसारखा कोणताही गोंधळ किंवा वाद न घालता चंद्रचूड यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं.

प्रशासनाच्या रडारवर तब्बल ५००० बंगले

गुरुग्राम प्रशासनाने सध्या अवैध बांधकामे आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एक अत्यंत कडक मोहीम हाती घेतली आहे. डीएलएफ फेज-१ ते फेज-५ या अतिश्रीमंत भागातील तब्बल ५,००० हून अधिक अलिशान घरांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ज्यांनी पार्किंगच्या जागेत, बागेत किंवा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केलंय, त्यांची घरे एकतर सील केली जात आहेत किंवा बुलडोझरने जमीनदोस्त केली जात आहेत. शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायसोबत ‘जोश’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणारा आणि अलीकडेच सुश्मिता सेनच्या ‘आर्या’ या वेब सीरिजमधून दमदार कमबॅक करणाऱ्या चंद्रचूड सिंह यांनाही याच मोहिमेचा फटका बसला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

ऐश्वर्या रायच्या ऑनस्क्रीन BF ला मोठा धक्का! अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने चालवला बुल्डोझर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *