मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916


मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध जिल्ह्यात पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली असून मुंबईतही पावस धो धो कोसळत आहे. त्यातच, मुंबई (Mumbai) शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे . 

मुंबई, कोकणसह या 5 जिल्ह्यातील नागरिकांनी रेट अलर्टच्या या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. केडीएमसी, पालघर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून उद्या जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यात उद्या पावसाचा जोर वाढणार असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे.  

हेल्पलाईन क्रमांक जारी

बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827,
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42

केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत कालावधीत ऑरेज होता आता, 4 आणि 5 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सदर कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट तसेच काही भागांत पाणी साचणे, पुरपरिस्थिती निर्माण होणे किंवा वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शनिवार 4 जुलै रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या (राज्य मंडळ, सी.बी.एस.ई. आय.सी.एस.ई. सी.आयई) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. 

पावसाची आजची आकडेवारी – सकाळी ८ः३० ते संध्याकाळी ५ः३० पर्यंत

नाशिक – १६ मिमी 
सातारा – १८ मिमी 
कोल्हापूर – १२ मिमी 
नवी मुंबई – ३० मिमी 
कुलाबा – ३७ मिमी 
रत्नागिरी – १३ मिमी 
पुणे – १२ मिमी 
महाबळेश्वर- ८५ मिमी 
माथेरान – ३० मिमी

सप्तशृंगीगड घाटात दरड कोसळली 

पावसाच्या संततधारेमुळे नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात रस्त्याच्या मध्यभागी दरड कोसळल्याची घटना समोर आली. सुदैवाने कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक व प्रशासनाने मदतकार्य राबवून दरडीचा मलबा बाजूला हटवून तत्काळ वाहतूक सुरळीत केली. 

हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *