मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  


Rohit Pawar :  राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबईसह कोकणात आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस कोसळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच घरात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर, सेलिब्रिटींना देखील बसला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जनक’ बंगल्यात देखील पावसाचं पाणी भरलं आहे. याच मुद्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्यावर नेत्यांपासून कलाकारापर्यंत सगळेच गप्प असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

मुंबईत महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं तरीही नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प आहेत असे रोहित पवार म्हणाले. आज राज्यात भाजप व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज सत्तेत असलेल्या कित्येकांनी रस्त्यावरच्या पाण्यात अक्षरशः डुबकी घेऊन नको ती नौटंकी केली असती. अनेक कलाकारांनीही वेगवेगळे डायलॉग मारले असते. पण आज तसं कुणीही दिसत नाही. याला काय म्हणावं? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच दुटप्पी भूमिका आणि सोयीचं मौन हे हॅग टॅग रोहित पवारांनी दिले आहेत. 

अमिताभ यांचा जनक बंगला प्रामुख्याने त्यांचं ऑफिस आणि पर्सनल जिम म्हणून वापरला जातो

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत पावसामुळं रस्त्यावंर पाणीच पाणी झालं आहे. या पावसाचा फटका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना बसला आहे. त्यांच्या जनक बंगल्यात देखील पाणी भरलं आहे. सेलिब्रिटींच्या बंगल्यात पाणी घुसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शूट करताना संबंधित इन्फ्लुएन्सर म्हणाला, “तुम्ही पाहू शकता की अमिताभ बच्चन यांच्या घरातही पाणी शिरलं आहे. संपूर्ण बंगला पाण्याने भरला आहे. आणि हे अमिताभ बच्चन यांचं दुसरं घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांचा जनक बंगला प्रामुख्याने त्यांचं ऑफिस आणि पर्सनल जिम म्हणून वापरला जातो. इथं त्यांच्या फिल्मशी संबंधित मीटिंग होता. ते मीडिया किंवा नातेवाईकांना भेटतात.

महत्वाच्या बातम्या:

Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या ‘संडे दर्शन’मध्ये बेशुद्ध झाला चाहता; ‘जलसा’ बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *