जेव्हा वीर्यातील स्पर्मची संख्या सामान्यहून कमी होते. तेव्हा यास लो स्पर्म काऊंट वा ओलिगोस्पर्मिया म्हटले जाते. आरोग्याची माहिती देणारी वेबसाईट mayoclinic नुसार एक मिलीमीटर वीर्यात १.५ कोटीहून कमी स्पर्म असतील त्यास सामान्यहून कमी संख्या म्हटले जाते. जर वीर्यात अजिबात स्पर्म नसतील तर यास एजूस्पर्मिया म्हणतात. अशा स्थित नैसर्गिक रुपाने गर्भधारणेची शक्यता घटते.
काय असतात संकेत?
स्पर्म काऊंट कमी झाल्याचे पहिले लक्षण म्हणजे प्रयत्न करुनही गर्भधारणा न होणे. मात्र, अनेकदा स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. काही पुरुषांच्या बाबतीत हार्मोन्समध्ये गडबड वा अनेक शारीरिक समस्याने लैंगिक इच्छेची कमतरता, इरेक्शनची सवय,टेस्टिकलमध्ये वेदना, सूज वा गाठ अशी लक्षणे देखील असतात.
काय कारण असते ?
केवळ धुम्रपान आणि तंबाखूच नाही तर लठ्ठपणा, सतत तणाव, प्रमाणापेक्षा जास्त दारु पिणे, अमली पदार्थांचे सेवन आणि हार्मोन्स असंतुलन देखील या स्पर्म काऊंटला प्रभावित करु शकते. याशिवाय काही इन्फेक्शन, वॅरिकोसिल सारखे आजार, थायरॉईडची समस्या काही औषधांचे दीर्घकालीन सेवन यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते एक वर्षभर विना गर्भनिरोधक नियमित संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या लोकांना आधी पासून टेस्टिकल, प्रोस्टेट वा लैगिंक आरोग्या संबंधित आजार असतील त्यांनी तपासणी करायला हवी. योग्य निदान झाल्यानंतर उपचार करणे सोपे जाते.
यावर इलाज आहे का?
शुक्राणूंची संख्या कमी असण्याचा अर्थ कायमचे वंध्यत्व असा होत नाही. आजकाल, विविध औषधे, जीवनशैलीतील बदल आणि आधुनिक प्रजनन उपचारांमुळे गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत होऊ शकते. संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, तणाव कमी करणे आणि धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळणे यांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही सुधारण्यास मदत होऊ शकते.