श्रीमंत लोक महिन्याला 5 लाख भाडं सहज देतील, पण स्वतःचं घर घेणार नाहीत; ही त्यांची हुशारी की निव्वळ मुर्खपणा? – Marathi News | Rich people like to pay rent for stay but did not buy own house know about their financial strategy


अभिनेत्री करिश्मा कपूर हिने काही दिवसांपूर्वीच तिचा फ्लॅट भाड्याने दिलाय. ज्यामुळे महिन्याला अभिनेत्रीला 5.51 लाख रुपये भाडं मिळतं, यापूर्वी देखील करिश्माचा फ्लॅट रेंटवर होता, ज्यातून तिला वर्षाला 1 कोटी पेक्षा अधिक भाडं मिळालं. यावेळ अभिनेत्री वर्षाला जवळपास 70 लाख रुपये भाडं मिळणार आहे. अशात असा प्रश्न उपस्थित होतो की, लाखो रुपये भाडं भरण्यापेक्षा तेच पैसे स्वतःच्या घरासाठी का गुंतवले जात नाही. ही लोकं 1 कोटी रुपये फक्त भाडं भरतात, तर स्वतःचं घर का घेत नाहीत, ही श्रीमंत लोकांची हुशारी आहे की, फक्त मुर्खपणा आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. पण स्वतःचं घर असण्याबाबत मोठ्या लोकांचं गणित थोडं वेगळं असतं. म्हणून ते भाड्याने राहण्याचा निर्णय घेतात.

सांगायचं झालं तर, कोट्यधीश, मोठे व्यापारी, सेलिब्रिटी, आणि हाय नेटवर्थ लोकं घर खरेदी करण्याचा निर्णय सामान्य लोकांप्रमाणे घेत नाहीत. त्यांच्यासाठी घर फक्त राहण्याची जागा नसते, तर एक फायनँशिल असेट देखील असतं. त्यांच्यानुसार, कोट्यवधी रुपये एका प्रॉपर्टीमध्ये लावण्याऐवजी, ते पैसे दुसरीकडे गुंतवल्यास अधिक फायदा होईल, ज्यामुळे त्यांची कमाई देखील मोठी होते. म्हणून महिन्याला लाखो रुपये भाडं भरणं त्यांच्यासाठी सामान्य असतं.

असं समजा, मुंबईतील एका मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आलिशान अपार्टमेंटची किंमत 35 कोटी रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे घर खरेदी केलं, तर त्यांच्या एकूण गुंतवणुकीतील मोठा हिस्सा एकाच मालमत्तेत अडकून राहिल. याउलट, जर तीच 35 कोटी रुपयांची रक्कम व्यवसाय, शेअर बाजार, प्रायव्हेट इक्विटी, स्टार्टअप्स किंवा इतर अशा पर्यायांमध्ये गुंतवली—ज्यातून 12% ते 15% वार्षिक परतावा मिळू शकेल, तर त्यातून दरवर्षी अनेक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं. अशा परिस्थितीत, वर्षाला 60 ते 70 लाख रुपये भाडं देणं हा अधिक फायदेशीर पर्याय ठरतो.

कॅश फ्लो टिकून आणि मजबूत राहतो…

व्यवसाय करणाऱ्यांसाठी रक्कम फार मोठी ताकद असते. जर कोट्यवधी रुपये घरात गुंतवले तर, ते पैसे परत मिळवणं फार कठीण असतं. पण तेच पैसे जर, नव्या व्यवसायात किंवा अन्य ठिकाणी गुंतवले तर, अडचणीच्या वेळेत ते पैसे सहज काढता येतात, त्यामुळे श्रीमंत लोक स्वतःचं घर घेण्यात कधीच पैसे खर्च करत नाहीत. झगमगत्या विश्वात देखील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे पण ते भाड्याच्या घरात राहतात.

गरजेनुसार बदलू शकतात घर…

मोठे व्यावसायिक, CEO आणि सेलिब्रिटी अनेकदा विविध शहरं आणि प्रदेशांमध्ये कार्यरत असतात. एखाद्याला आज कदाचित मुंबईतील वांद्रे येथे राहावं लागत असेल, तर काही वर्षांनंतर जुहू, दिल्ली, दुबई किंवा लंडन येथे राहण्याची गरज निर्माण होऊ शकते. अशा वेळी, घर भाड्यानं घेतल्यास त्यांना कोट्यवधी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या कटकटीशिवाय सहजपणे नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याचे स्वातंत्र्य मिळते.

सी फेसिंग रुम, प्रीमियम टॉवर्स, खाजगी क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, उच्च-स्तरीय सुरक्षा आणि इतर आलिशान सुविधा असलेली घरं खरेदी करण्यासाठी अनेकदा 50 कोटी ते 100 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. पण यापेक्षा खूपच कमी खर्चात भाडेतत्त्वावर या सुविधांचा लाभ घेता येतो. त्यामुळेच, अनेक लोक मालकीहक्कापेक्षा सुविधांच्या वापराला अधिक पसंती देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *