Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल.. दुर्मिळ योग बनला! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व जाणून घ्या.. 


Sankashti Chaturthi 2026: सुखकर्ता…दु:खहर्ता भगवान गणेश…हे हिंदू धर्मातील सर्वप्रथम पूजले जाणारे, बुद्धी, विवेक, ज्ञान, समृद्धी आणि विघ्नहर्ता देवता मानले जातात. ज्यांच्या केवळ नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होते. अशा या बाप्पाला समर्पित आजचा दिवस आहे, कारण आज संकष्टी चतुर्थी आहे. पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे. जिला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात, कारण या दिवशी अत्यंत शुभ योगायोग जुळून आला आहे, जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, भाग्यशाली राशी, योग्य तिथी, चंद्रोदय वेळ, पूजेची पद्धत…

संकटांचा नाश करणारी… संकष्टी चतुर्थी…(Sankashti Chaturthi 2026)

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. ‘संकष्टी’ म्हणजे संकटांचा नाश करणारी. या दिवशी भगवान गणेशाची भक्तिभावाने पूजा, उपवास आणि चंद्रदर्शन केल्याने जीवनातील अडथळे, संकटे दुःख दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.. जुलैच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे, कारण ही कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी आहे, ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येतेय. यावर्षी, संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ वेळ आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. 

संकष्टी चतुर्थी तिथी

मराठी दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवार, 3 जुलै रोजी सकाळी 11:30  वाजता सुरू होईल. ही तिथी शनिवार, 4 जुलै रोजी दुपारी 12:39 वाजता समाप्त होईल. उदय तिथी आणि चंद्रोदयाच्या वेळेवर आधारित, कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी शुक्रवार, 3 जुलै रोजी असेल…

संकष्टी चतुर्थी 2026 चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2026 Moon Rise)

धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय अपूर्ण आहे. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 9:52 वाजता होईल.

संकष्टी चतुर्थीला जुळला दुर्मिळ योग…

वैदिक पंचांगानुसार आज संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 5:28 वाजता तयार झाला आणि सकाळी 11:46 पर्यंत राहील. या योगामध्ये गणेशाची आराधना केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. याव्यतिरिक्त, त्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत विष्कंभ योग आणि त्यानंतर प्रीती योग असेल. सकाळी 11:46 वाजेपर्यंत श्रावण नक्षत्र आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र असेल.

संकष्टी चतुर्थी 2026 मुहूर्त

जुलैमध्ये संकष्टी चतुर्थीला, ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:07 ते पहाटे 4:47 पर्यंत आहे तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:57 ते दुपारी 12:53 पर्यंत आहे. गणेशपूजेसाठी लाभ मुहूर्त सकाळी 7:12 ते 8:56 पर्यंत असतो, तर अमृत-संवाद मुहूर्त सकाळी 8:56 ते 10:41 पर्यंत असतो.

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ, सात्त्विक वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्रीगणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा प्रतिष्ठापित करावी. पूजेपूर्वी व्रताचा संकल्प करून दिवसभर उपवास करण्याचा निश्चय करावा. पूजेदरम्यान प्रथम गणेशाला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने आचमन करून लाल वस्त्र, यज्ञोपवीत, चंदन, कुंकू, अक्षता आणि लाल फुले अर्पण करावीत. गणेशाला 21 किंवा शक्य असल्यास 11 दुर्वांच्या जुड्या वाहाव्यात. त्यानंतर धूप, दीप प्रज्वलित करून मोदक, लाडू, फळे, नारळ आणि इतर नैवेद्य अर्पण करावा. पूजेच्या वेळी “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करावा. तसेच गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र आणि गणेशाची आरती म्हणावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर दिवसभर श्रद्धेने उपवास पाळावा. अनेक भाविक या दिवशी फळाहार किंवा दूध-फळांचे सेवन करतात. सायंकाळी चंद्र उगवल्यानंतर प्रथम चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर भगवान गणेशाची पुन्हा पूजा करून नैवेद्य अर्पण करावा. चंद्रदर्शन आणि गणेशपूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा.

3 जुलै 3036 रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त ज्योतिषीय मान्यतांनुसार 5 राशींसाठी दिवस शुभ…

वृषभ – आर्थिक लाभाची शक्यता, रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह – करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल.
तूळ – व्यवसाय व नोकरीत सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता. नवीन संधी मिळू शकतात.
धनु – धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवास, शिक्षण आणि आर्थिक बाबतीत अनुकूल परिणाम मिळू शकतात.
मीन – मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि आरोग्य सुधारेल.

हेही वाचा :

Shravan 2026: श्रावण महिना..अध्यात्म – निसर्गाचा सुंदर संगम! कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *