Jalgaon : पत्नीचे दागिने विकून जलजीवनची कामे पूर्ण केली, पण अडीच वर्ष झालं तरी मोबदला मिळाला नाही, ठेकेदारांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु


Jalgaon : जलजीवनची कामे केली मात्र कामाचा मोबदला मिळाला नसल्याने जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा गावात पाण्याच्या टाकीवर चढून सुभाष सोनवणे आणि सुवर्ण सिंह ठाकूर या दोन्ही ठेकेदारांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी त्यांचा परिवार देखील आंदोलनात सहभागी झाला आहे. काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश या परिवाराने केल्याच पाहायला मिळालं. काम होऊन अडीच वर्ष झालं तरीदेखील त्यांना कामाचा मोबदला मिळाला नसल्यानं  पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं आहे. 

पदराचा पैसा खर्च  करुन कामे पूर्ण केली, मात्र अडीच झालं तरी पैसे मिळाले नाहीत

जळगाव जिल्ह्यात शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचे माध्यमातून पाण्याच्या टाकी  उभारणे, जॅकवेल उभारणी करणे सारखी कामे सुभाष सोनवणे आणि सुवर्ण सिंह राजपूत या दोन्ही ठेकेदारांनी केली आहेत. यासाठी त्यांनी कर्ज घेऊन तर कुठे परिवारातील पत्नीचे डाग दागिने विकून, पदराचा पैसा खर्च  करुन कामे पूर्ण केली आहेत. मात्र अडीच वर्ष होऊन देखील त्यांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने, या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात स्वतः जवळ पैसे नसल्याने लोकांकडून कर्ज घेऊन दिवस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्जदार घरी येऊन बायका मुलांना धमकावून पैशाची मागणी करत असल्याने, सुभाष सोनवणे यांच्या मुलाने घरातून पळ काढला आहे. तर या दोन्ही ठेकेदार वर देखील अशीच वेळ आल्याने, या परिवाराने आंदोलनाचा पवित्र घेतला आहे.

पैसे मागितलं की धमकावलं जात, ठेकेदारांनी केला आरोप

भुसावळ येथील मनोज बियाणी नावाच्या ठेकेदाराने अडीच वर्ष पासून आपले पैसे दिले नाहीत. उलट धमकावलं जात असल्याचा आरोप या ठेकेदारांच्या परिवाराने केला आहे. आपल्या व्यथा सांगताना या परिवारचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. पैसे अडून ठेवणाऱ्यांना पाझर फुटेल का? हाच खरा प्रश्न आहे.जलजीवन मिशन योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना. खेड्यापाड्यात पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं, आरोग्याच्या समस्या दूर व्हावं, खेड्यापाड्यातील माता बहिणींच जीवनमान सुधारावे यासाठी मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने ही योजना आणली. योजनेची अंमलबजावणी देशभरात सुरु झाली. महाराष्ट्रातही 52 हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली. त्यातील 50 टक्के काम पूर्ण झाली. मात्र 50 टक्के कामं निधी अभावी सुरू झाली नाहीत आणि जी कामं पूर्ण झाली त्या कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये आज थकीत आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *