रेडमी टर्बो 5 स्मार्टफोन या दिवशी भारतात होणार लाँच, मिळणार दमदार फीचर्स – Marathi News | Redmi Turbo 5 to be launched in India on this day will be presented with powerful features and an attractive display


शाओमीच्या (Xiaomi) सब-ब्रँड असलेल्या रेडमीचा नवीन स्मार्टफोन रेडमी टर्बो 5 लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. रेडमीने या वर्षी जानेवारीमध्ये चीनमध्ये रेडमी टर्बो 5 आणि रेडमी टर्बो 5 मॅक्स सादर केले होते. विशेष म्हणजे, हा रेडमीचा भारतात येणारा पहिला टर्बो-सिरीज स्मार्टफोन असू शकतो, ज्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तर भारतात लाँच होणारा हा फोन परफॉर्मन्सवर केंद्रित असल्याचा दावा केला जात आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे कंपनी कडून अद्याप या फोनची अधिकृत लाँच तारीख जाहीर केलेली नाहीये. पण टिपस्टर यांनी एक्स (X) वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात म्हटले आहे की हा रेडमी फोन 16 जून 2026 रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. त्यातच लाँच तारखेव्यतिरिक्त टिपस्टरने फोनच्या वैशिष्ट्यांबद्दलही माहिती दिली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण रेडमीच्या या स्मार्टफोनचे खास फिचर्स जाणून घेऊयात.

रेडमी टर्बो 5 चे लीक नुसार स्पेसिफिकेशन्स

या आगामी फोनसाठी Mi.com आणि Amazon वर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, परंतु सध्या या मायक्रोसाइटवर लाँचची तारीख किंवा फिचर्स जाहीर करण्यात आलेले नाहीत. टिपस्टर यांनी केलेल्या पोस्टनुसार, हा रेडमी फोन 6.59-इंचाच्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल, जो 1.5K रिझोल्यूशन आणि 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. याव्यतिरिक्त, वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर असेल. शिवाय या फोनमध्ये 7560mAh बॅटरीसोबतच 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.

कॅमेरा कसा असेल?

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा LYT600 सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आणि सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि व्हीसी कूलिंगचा समावेश आहे. मेटल फ्रेम आणि IP66, IP68, व IP69 रेटिंग्स असलेल्या या फोनची जाडी 8.18 मिमी असून वजन 204 ग्रॅम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *