इच्छा असूनही अनेक महिलांना रक्तदान करता येत नाही, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण… Video | आरोग्य बातम्या


Last Updated:

Blood Donor Day: महिलांना रक्तदान करण्यासाठी त्यांचे आरोग्य हीच मोठी समस्या असते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने अनेकींना रक्तदान करता येत नाही.

+

इच्छा

इच्छा असूनही अनेक महिलांना रक्तदान करता येत नाही, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण… Video

छत्रपती संभाजीनगर : रक्तदान हे जीवनदान मानले जाते. मात्र, रक्तदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण आजही पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. महिलांमध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी असण्यामागे हिमोग्लोबिनची कमतरता हे सर्वात मोठे कारण आहे. याबाबतच छत्रपती संभाजीनगरमधील दत्ताजी भाले रक्तपेढीच्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.

रक्तदान करण्यासाठी किमान 12.5 ग्रॅम हिमोग्लोबिन असणे आवश्यक असते. मात्र, अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण यापेक्षा कमी आढळते. त्यामुळे रक्तदानासाठी इच्छुक असूनही अनेक महिलांना रक्तदान करता येत नाही. हिमोग्लोबिन कमी होण्यामागे विविध कारणे असू शकतात. काही महिलांमध्ये आरोग्याच्या समस्या असतात, तर काहींचा आहार संतुलित नसतो. वारंवार उपास करणे, जंक फूडचे वाढते सेवन आणि पोषणमूल्यांचा अभाव याचाही परिणाम हिमोग्लोबिनवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांनी आपल्या आहारात प्रथिने, फायबर्स, आवश्यक फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच पालेभाज्या, कडधान्ये, फळे यांसह गूळ-शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.

हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असल्यास महिलाही सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात. साधारणपणे प्रत्येक चार महिन्यांनी महिला रक्तदान करू शकतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राखल्यास रक्तदान चळवळीत त्यांचा सहभाग अधिक वाढू शकतो, असे आवाहन डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *