दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे. मात्र, यादरम्यानच गंभीर आरोप करत सोनम वांगचुक यांच्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी म्हटले आहे की, सफदरजंग रुग्णालयावर त्यांचा विश्वास नाही. यासोबतच त्यांनी मागणी केली की, सोनम वांगचुक यांना तात्काळ उपचारासाठी इतर रुग्णालयात हालवण्याची परवानगी द्यावी. यासोबतच त्यांनी आरोप केला की, उपचारासाठी त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले.
दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत गीतांजली यांनी म्हटले की, सोनम वांगचुक जंतर मंतर मैदानात आंदोलनासाठी बसले. 21 दिवसापासून ते तिथे होते. ज्यावेळी त्यांना सफदरजंद रुग्णालयात नेले गेले, त्यावेळी तिथे वकील आणि गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या डॉक्टरांपासून त्यांना वेगळे ठेवण्यात आले.
या याचिकेत मागणी करण्यात आली की, वांगचुक यांची सध्याची स्थानबद्धता घटनाबाह्य तसेच अनुच्छेद 19 आणि 21 चे उल्लंघन असल्याचे घोषित केले जावे. त्यांना ठेवण्यात आलेल्या रुग्णालयातून इतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वाटते तिथे उपचारासाठी घेऊन जाऊ दिले जावे, याबाबत आदेश द्यावा. मीडियासोबत बोलताना गीतांजली आंग्मो यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, रूग्णालयाने कुटुंबियांना सांगितले की, वांगचुक यांच्या शरीरातील पॉटेशियम स्तर 2.9 झाला.
I have lost faith in Safdarjung Government Hospital.
The hospital told us @Wangchuk66’s potassium had dropped to 2.9, describing it as alarming and life-threatening. Yet, in its public health bulletin, it conveniently omitted the actual number, referring only to “decreasing…— Gitanjali J Angmo (@GitanjaliAngmo) July 19, 2026
जे अत्यंत धोकादायक आहे. पण हेल्थ बुलेटिन दरम्यान हा आकडा दाखवण्यात आला नाही. सोनम वांगचुक यांच्या पत्तीने दावा केला की, रात्री 10.30 वाजता कुटुंबाने स्वतंत्र लॅबमध्ये त्यांचे रक्त तपासले असता त्या रिपोर्टमध्ये त्यांचा पॉटेशियम स्तर 3.5 आला. जे सामान्य असल्याचे मानले जाते. त्याच आधारावर त्यांनी सोनम वांगचुक यांच्या मेडिकल रिपोर्टबद्दलही काही प्रश्न उपस्थित केले.