राजेश्वरी खरातला आज महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती ओळखते. फँड्री चित्रपटापासून सुरू झालेले तिचे करिअर आज नव्या वळणावर आहे. तिने आतापर्यंत अनेक व्हिडीओ साँग आणि चित्रपटात काम केलेले आहे.
राजेश्वरी खरात म्हणजेच फँड्री चित्रपटातील शालू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रावर लाखोंनी चाहते आहेत. तिच्या एका फोटोलो हजारो लाईक्स असतात. तिचे चाहते आवडीने तिच्या सौंदर्याची स्तुतीही करतात.
राजेश्वरी खरातने आपल्या सोशल मीडिया खात्यावर वेगवेगळ्या ड्रेसमधील फोटो अपलोड केलेले आहेत. परंतु तिच्या साडीमधील लुकला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलेले आहे. त्यामुळेच राजेश्वरीने नुकतेच एक खूपच छान फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
तिने निळ्या आणि लाल साडीमधील एक मनमोहक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. हा फोटो अपलोड करताना तिने Poise and pretty pleats ..असे इंग्रजीत कॅप्शन दिले आहे. मोकळ्या केसांमधील तिचा हा साडी लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडल आहे.
राजेश्वरी खरातने या फोटोमध्ये साडीला मॅच करणारे निळ्या रंगाचे आणि लाल जरी असलेले ब्लाऊज परिधान केले आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. राजेश्वरीचे इन्स्टाग्रामवर साडे चार लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.




