ठाकरे गटातून फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता, आदित्य ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले, काही वेगळी.. – Marathi News | Aditya Thackeray has reacted strongly after the Lok Sabha Speaker approved the merger of the rebel MPs into the Shinde faction


शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. हा ठाकरे गटाला मोठा धक्का होता. या खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दल पत्रही दिले. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भूकंप आला. ज्यानंतर ठाकरे गटाने पक्षाचे व्हिप जारी करत बैठकीला उपस्थित राहण्याचे सर्व खासदारांना आदेश दिले. मात्र, तरीही हे खासदार बैठकीला उपस्थित राहिली नाहीत. मात्र, खासदारांनी बंडखोरी करून काही दिवस झाले तरीही बंडखोर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मान्यता मिळाली नव्हती. काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

थेट या गटाला मान्यता मिळाली. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांच्या मतदार संघात थेट सभा घेतल्या आणि यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मुंबईमध्ये परतताच पुन्हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. सचिन आहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, काही वेगळी अपेक्षा होती का? आम्ही अन्याय सहन करत आहोत. सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले ते आज संपूर्ण देशासोबत घडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला मोठी घरघर लागली आहे. मोठी बंडखोरी त्यांच्या पक्षात होत आहे. खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुध, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचाैरे यांनी शिवसेना ठाकरे गटातून थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता लोकसभा अध्यक्षांकडूनही मान्यता मिळाली आहे. अजूनही शिंदेंकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *