मोठी बातमी! महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाचं घोडं नेमकं कुठे आडलं? शिवसेनेला किती जागा मिळणार? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं – Marathi News | How many seats will the shiv sena shinde group get in the legislative council in the grand alliance eknath shindes first reaction


राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राज्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1  जून आहे. दरम्यान आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. तर दुसरीकेड महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवण्यात येणार आहेत, मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं नेमकं कुठे आडलं असा प्रश्न यावेळी शिंदे यांना विचारण्यात आला, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.  महाविकास आघाडी 17 जागा लढवेल पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही, महायुती सर्व 17 जागा लढवेल आणि सर्व जागा जिंकेल. जागा वाटापाबाबत काय सुरू आहे, हे आता तुम्हाला उद्या कळेल. जागा वाटपाच्या फॉर्म्यूल्याबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.  महायुतीमध्ये जागा वाटप सन्माने होईल,  माहायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महायुती एकमताने 17 जागा लढवले, आणि सर्व जागा जिंकेल असा विश्वास आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सर्व जागा लढवणार

दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यातील सर्व 17 विधान परिषदेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. काँग्रेस 7 ते 8 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गट 5 ते 6 जागा लढवण्याची शक्यात आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *