भाजप धक्का देण्याच्या तयारीत, विधान परिषदेसाठी बहुजन विकास आघाडीच्या बड्या नेत्याला तिकीट? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

ठाणे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बविआ नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदार राजन नाईक आणि खासदार हेमंत सावरा यांनी राजीव पाटील यांची भेट घेतल्यानंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

राजीव पाटील
राजीव पाटील

विजय देसाई, प्रतिनिधी, विरार : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आमदार राजन नाईक आणि खासदार हेमंत सावरा यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, भाजपकडून विधानपरिषदेसाठी तिकीट मिळाल्यास तो माझ्यासाठी सन्मान असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ठाणे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बविआ नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदार राजन नाईक आणि खासदार हेमंत सावरा यांनी राजीव पाटील यांची भेट घेतल्यानंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

मी एवढा मोठा नेता नाही पण स्वत:ला कमीही समजत नाही

यावर प्रतिक्रिया देताना राजीव पाटील म्हणाले की, माझी जी भेट झाली त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पालघर जिल्ह्यात भाजपकडे मोठे नेते आहेत. मात्र माझ्या नावाची चर्चा होत असेल तर मी ते माझे भाग्य समजतो. तसेच ठाणे विधानपरिषद मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याचे सांगत, माझ्याकडे अशी कोणतीही अधिकृत चर्चा नाही. मी एवढा मोठा नेता नाही, पण स्वतःला कमीही समजत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने मला तिकीट दिले तर मी त्याच्या लायक आहे असे समजेन

तिकीटाबाबत विचारले असता, “मी असा कोणता विचार केलेला नाही. पण भाजपने मला तिकीट दिले तर मी त्याच्या लायक आहे असे समजेन,” असे वक्तव्यही त्यांनी केले.

राजीव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीत नेमकी कोणती राजकीय घडामोड घडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत राजीव पाटील?

राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत

राजीव पाटील यांचे विरार भागात वर्चस्व

राजीव पाटील हे वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राहिले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *