Pranit More on Controversy: 370 रुपयांच्या बिर्याणीचा (370 Biryani) वाद अन् डॉ. सेजल पवार (Sejal Pawar) हिनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर केलेली अश्लील टिपण्णी, सध्या कॉमेडी शोमधील ऑडियन्समुळे प्रणित मोरे (Pranit more) चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या हिमांशू जांगडाने तरुणीसोबत डेटवर गेल्याचा अनुभव शेअर केला. ‘370 रुपये बिर्याणीवर खर्च केले, आता ते वसूल करावे लागतील ना…’ असं म्हणत त्यानं तरुणीकडून शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचं आपल्या वक्तव्यातून सूचित केले. यावरुन प्रणित मोरेसह सगळे हसत होते. शोमधील या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे प्रणित मोरेवरही टीका करण्यात आली. प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार या तिघांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिमांशू जांगडाला आपली नोकरी गमवावी लागली. डॉ. सेजल पवार हिच्याही अडचणीत वाढ होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रणितने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केलं. वाद इतका चिघळला की त्यानं आज इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफी मागितली.
प्रणित मोरेनं माफी मागत, चूक सुधारण्यासाठी संधी मागितली (pranit more apology)
माफी मागत प्रणित मोरे म्हणाला की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला बोलायचं होतं, पण माझं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा एक व्हिडीओ पाहिला असेल, माझ्यावर टीका होत आहे. त्या तरुणासोबत मी क्राऊडवर्क करत होतो. तेव्हा त्यानं काही अपमानास्पद गोष्टी बोलल्या. सर्व जण हसत होते, मी देखील भावनेच्या भरात वाहून गेलो. मी त्यावेळी थांबवू शकलो असतो, पण त्यावेळी मी ते करु शकलो नाही. जे कुणी दुखावले असतील, मी त्यांची माफी मागतो’.
‘कायदेशीर कारवाईला मी सहकार्य करतो. मी चांगला माणूस बनून दाखवेन अन् माझ्या कंटेटवर काम करेन’, असं प्रणित मोरे आपल्या व्हिडीओत म्हणाला.
370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद नेमका आहे तरी काय? (370 Biryani Controversy)
नुकत्याच पार पडलेल्या कॉमेडी शोमध्ये हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार हे सहभागी झाले होते. प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशूनं डेटिंगच्या अनुभवाबद्दल सांगितले होते. त्यानं एका तरुणीला डेटवर नेले होते. 370 रुपयांची बिर्याणी तरुणीला खाऊ घातली. पैसे तरुणाने भरले. पैसे भरल्यामुळे आता त्या बदल्यात आपल्याला तरुणीकडून काहीतरी मिळायला हवे, असे विचार त्याने सर्वांसमोर मांडले. हे ऐकून प्रणित मोरेसह सर्व जण हसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. यानंतर हिमांशूला नोकरीवरुन काढण्यात आले.
राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण घटनेची दखल घेतली. महाराष्ट्र सायबर सेलनेही प्रणित मोरे अन् हिमांशू विरोधात गुन्हे दाखल केले.
डॉ. सेजल पवार हा वाद नेमका आहे तरी काय? (Doctor Sejal Pawar On Death Bodies Controversy)
डॉ. सेजल पवार हिनं प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. तिनं यावेळेस कॉलेजमधील शवविच्छेदनाचा अनुभव शेअर केला होता. तिनं या शोमध्ये, डेड बॉडीचे प्रायव्हेट पार्ट पाहून जोक मारायचो, असं तिनं म्हटलं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सायबर सेलने तिला चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, डॉ. सेजल पवार हिनं लेखी माफी मागितली असून, तिनं केलेल्या वक्तव्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तिनं कबूली दिली. सुत्रांच्या माहितीनुसार, सेजलवर कॉलेज प्रशासनाकडून निलंबनाची किंवा इतर मोठी कारवाई केली जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
मला एक संधी द्या…प्रणित मोरेचा माफीनामा; शोमधील वादावर अखेर स्पष्टीकरण, माफी मागत काय काय म्हणाला?
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष