नवी दिल्ली : एलन मस्क यांची स्पेसेक्स कंपनी 12 जूलना अमेरिकन शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. स्पेसेक्सचा शेअर नॅस्डॅकवर लिस्ट झाला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी 19 टक्क्यांची तेजी दिसून आली. यामुळं स्पेसेक्स जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या यादीत दाखल झाली. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार स्पेसेक्सचं बाजारमूल्य 2.2 लाख कोटी डॉलर झालं आहे. यामुळं एलन मस्क हे जगातील पहिले ट्रिलिनेअर बनले आहेत. एक ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी डॉलर्स होय. फोर्ब्स रिअल टाइम बिलिनेअर इंडेक्स नुसार एलन मस्कची नेटवर्थ 1.1 लाख कोटी डॉलर्स झाली आहे.
SpaceX चा शेअर किती रुपयांना?
स्पेसेक्सचा आयपीओ 75 अब्ज डॉलर्सचा होता. जगातील आतापर्यंतचा तो सर्वात मोठा आयपीओ आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कंपनीचा शेअर 135 डॉलर प्रति शेअर होता. तो 31 टक्क्यांपर्यंत वाढला. बाजार बंद होताना स्पेसेक्सचा शेअर 160.96 डॉलर्सवर बंद झाला. यामुळं स्पेसेक्सचं बाजारमूल्य 2.2 लाख कोटी डॉलर झालं आहे. यामुळं पहिल्याच दिवशी स्पेसेक्स कंपनी बाजारमूल्याच्या निकषावर विचार केल्यास जगातील सर्वात मोठी सहावी कंपनी बनली आहे. भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास स्पेसेक्सचा एक शेअर 15318.96 रुपयांवर आहे. स्पेसेक्स नॅस्डॅकवर लिस्ट झालेला असून S अँड P वर एंट्रीसाठी अजून वाट पाहावी लागेल.
एलन मस्क म्हणाले की एका गोदामातून सुरु झालेल्या कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आणला असून तो सार्वजनिक होतोय. ही कंपनी अपयशी ठरेल, असं कधी कधी वाटायचं, अशी आठवण एलन मस्क यांनी सांगितली.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आयपीओसाठी संस्थात्मक आणि रिटेल गुंतवणूकदारांकडून 350 अब्ज डॉलर्सची बोली लागली. ऑर्डर देणाऱ्या फर्मपैकी एक तृतियांश फर्मला कोणताही स्टॉक मिळाला नाही. रिटेल ट्रेडर्सकडून 100 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक बोली लागली होती. या कॅटेगरीतील गुंतवणूकदारांना फक्त 15 अब्ज डॉलर्सचे शेअर मिळाले.
SpaceX च्या आयपीओनं सौदीच्या अरामकोच्या आयपीओचा विक्रम मोडला आहे. स्पेसेक्सच्या अगोदर सौदी अरामकोचा आयपीओ सर्वात मोठा होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार डिसेंबर 2019 ला रियाद एक्सचेंजवर 25.6 अब्ज डॉलर्स अरामकोनं आणले होते. कंपनीचं बाजारमूल्य 1.71 लाख कोटी डॉलर्स होतं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!