Last Updated:
आसाममधील जोरहाट येथील रोरिया एअरफोर्स स्टेशनवर भारतीय वायूसेनेचे AN-32 मालवाहू विमान कोसळले, पायलट शहीद झाल्याची भीती, तपास आणि बचावकार्य सुरू
भारतीय वायूसेनेचे मालवाहू विमान AN-32 रोरिया कोसळून मोठी दुर्घटना झाली. या भीषण अपघातात पायलट शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर-पूर्व भारत आणि आसाममधील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं जाणाऱ्या जोरहाट इथे धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, AN-32 हे वायूसेनेचं एक महत्त्वाचे मालवाहू विमान होतं.

आसाममधील जोरहाट इथे असलेले रोरिया एअरफोर्स स्टेशन हे देशाच्या आणि विशेषतः ईशान्य भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचं मानलं जातं. याच विमानतळावर विमान क्रॅश झाल्याची दुर्घटना घडली. विमानाचा बराचशा भागाचं मोठं नुकसान झालं.

विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून अत्यंत चिंताजनक माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी अपघातात विमानाचा वैमानिक दगावल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून, वायुसेनेचे उच्च अधिकारी या अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की यामागे इतर काही कारण होते, याचा तपास आता केला जात आहे.
Delhi,Delhi,Delhi
Jun 13, 2026 11:29 AM IST
