Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी


Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: गायक राहुल देशपांडे (Singer Rahul Deshpande), अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik), पियुष रानडे-मयुरी वाघ या मराठी सेलिब्रिटींच्या (Marathi Celebrity) घटस्फोटाच्या (Marathi Celebrity Divorced) बातम्यांनी अख्खी इंडस्ट्री हादरलेली. अशातच आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचा समावेश झालाय. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे (actor Adinath Kothare) आणि आघाडीची अभिनेत्री उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar) यांनी आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसाराचा शेवट करत घटस्फोट घेतलाय. मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) टॉप सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेल्या जोडप्यानं विभक्त होत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलंय. खरंतर खूप दिवसांपासूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं. याचं कारण दोघेही कित्येक दिवसांपासून एकमेकांसोबत दिसत नव्हते. पण, दोघांनीही यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नव्हतं. अशातच अखेर दोघांनी सोशल मीडियावरुन घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. दोघांची ही पोस्ट पाहून चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे. 

 

 

View this post on Instagram

 

उर्मिला कानेटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारे म्हणजे, मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉप सेलिब्रिटी कपल्सपैकी एक. दोघांमध्ये आधी घट्ट मैत्री होती, नंतर या मैत्रीचंच रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांची हळूहळू फुलत गेलेली लव्हस्टोरी एकाद्या सिनेमापेक्षाही भन्नाट होती. 

आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांची प्यारवाली लव्हस्टोरी (Adinath Kothare And Urmila Kanetkar Love Story)

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेनं सिनेसृष्टीतल्या करिअरला नुकतीच सुरुवात केलीय. अभिनेत्री म्हणून तिचा एकही सिनेमा आला नव्हता. त्याच दरम्यान, महेश कोठारे ‘शुभमंगल सावधान’ हा सिनेमा करत होते. त्यांना त्यांच्या सिनेमासाठी नवा चेहरा हवा होता. उर्मिलाला हे कळताच, तिनं सिनेमाबाबत बोलण्यासाठी महेश कोठारेंशी संपर्क साधला आणि त्यावेळी महेश कोठारे यांनी तिला घरीच येण्याचं आमंत्रण दिलं. ठरल्याप्रमाणे उर्मिला महेश कोठारेंना भेटण्यासाठी घरी गेली. उर्मिला त्यांच्या घरी गेली. तेव्हा तिथे आदिनाथ देखील होता. तो नुकताच झोपेतून उठला होता. त्यानं उर्मिलाकडे पाहिलं आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. आणि तिथूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या लव्हस्टोरीचा श्रीगणेशा झाला. 

Ramayana actor Addinath Kothare and Urmila Kanetkar end 15-year marriage, seek privacy and respect amid divorce | Bollywood

‘शुभमंगल सावधान’ सिनेमाच्या सेटवर फुलली मैत्री 

उर्मिला कानेटकरचा ​’शुभमंगल सावधान’ हा तसा पहिलाच सिनेमा होता. महत्त्वाची बाब म्हणजे, आदिनाथही या सिनेमाशी जोडला गेला होता. तो या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता. या सिनेमाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिला यांची पुन्हा भेट झाली. पुढे दोघांच्या सेटवरच्या भेटीगाठी वाढल्या, मैत्री वाढली… नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथनं उर्मिलाला मुंबईत प्रपोज केलं. नंतर बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 20 डिसेंबर 2011 रोजी दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. 

2011 मध्ये उर्मिला हिनं आदिनाथसोबत आपली लग्नगाठ बांधली आणि मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कुटुंबापैकी एक असणाऱ्या कोठारे कुटुंबाची सून झाली. त्यानंतर 2017 मध्ये उर्मिलानं गोंडस मुलीला जन्म दिला. उर्मिला आणि आदिनाथ यांच्या मुलीचं नाव जिजा आहे. मुलीच्या जन्मानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना, उर्मिला आणि आदिनाथ यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला. अखेर आज दोघांनी पोस्ट करुन वेगळं झाल्याचं जाहीर केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: ‘सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण…’; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *