Last Updated:
Swapnil Joshi New Car : अभिनेता स्वप्नील जोशीने नवीन कार खरेदी केली आहे. त्याची ही कार जगातील सध्याची आघाडीची कार आहे. महागडी आहे म्हणून नाही तर स्वप्नीलनं एका वेगळ्याच कारणासाठी ही कार खरेदी केली आहे.
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी मराठीतील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याला कार्सचं प्रचंड वेड आहे. स्वप्नील जोशीची भन्नाट कार कलेक्शन आहे. त्याला कारची प्रचंड आवड आहे. आतापर्यंत त्याच्याकडे महागड्या लग्झरी कारचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे Jaguar I-Type, रेंज रोवर डिफेंडर, BMW सारख्या अनेक लग्झरी कार आहेत. त्याच्या महागड्या कार कलेक्शनमध्ये आता लग्झरी Tesla YL कारची एन्ट्री झाली आहे. स्वप्नीलच्या या नव्या कारची किंमत माहितीये? स्वप्नीलनं इमोशनल पोस्ट शेअर करत त्याच्या नव्या कारची माहिती दिली आहे.
स्वप्नीलनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, “मी लहान असताना माझे बाबा सायकल चालवायचे. त्यांना पाहताना एक दिवस माझ्याकडेही जगातील सर्वोत्तम सायकल असावी, असं स्वप्न मी नेहमी पाहायचो. पण आयुष्याने काही वेगळ्याच योजना आखल्या होत्या आणि काळाच्या ओघात ते बालपणीचं स्वप्न कुठेतरी हरवून गेलं.”
“वर्षांनंतर लोक ज्या कारला जगातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर-आधारित कार म्हणतात… आज ती कार माझ्या घरी आणण्याचं भाग्य मला लाभलं आहे. ती अमेरिकन कंपनीची आहे म्हणून नाही… ती महागडी आहे म्हणूनही नाही…तर ती भविष्याचं प्रतीक आहे म्हणून… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ती मी अभिमानाने भारतातच खरेदी करू शकलो म्हणून.”
“पण या कारपेक्षाही मोठा आनंद दुसऱ्याच गोष्टीत आहे. माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांत दाटलेला आनंद पाहण्यात… जणू ते न बोलताच सांगत आहेत. आपला छोटा मुलगा खूप मोठा झाला. माझ्या मुलांच्या नजरेत आज त्यांचा बाबा थोडा अधिक ‘कूल’ झालेला पाहण्यात. आणि माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं ते समाधानाचं हसू पाहण्यात… कारण तिच्यासाठी ही फक्त एक कार नाही, तर एका नव्या प्रवासाची, नव्या युगाची सुरुवात आहे.”
स्वप्नीलनं पुढे लिहिलंय, “या सगळ्या भावनांमध्ये मला अजूनही तो लहान मुलगा दिसतो… जो कधीकाळी जगातील सर्वोत्तम सायकलचं स्वप्न पाहायचा. कदाचित त्याला त्याची स्वप्नातील सायकल कधीच मिळाली नाही. पण आयुष्याने त्याच्यासाठी त्याहूनही मोठं स्वप्न जपून ठेवलं होतं. स्वागत आहे, Tesla YL! कारण स्वप्नं नेहमी आपण जशी पाहतो तशीच पूर्ण होत नाहीत… कधी कधी ती आपल्या कल्पनेच्याही पलीकडे जाऊन पूर्ण होतात.”
स्वप्नील जोशीनं खरेदी केलेली Tesla YL ही कार इलेक्ट्रिक कार आहे. या कारची सध्याच्या बाजारातील किंमत ही जवळपास 65 लाख इतकी आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 17, 2026 12:19 PM IST
स्वप्नील जोशीनं घेतली जगातील सर्वोत्तम कार! महागडी म्हणून नाही तर… सांगितलं वेगळंच कारण
