बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?


OTT Movie: काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. मात्र, OTT वर प्रदर्शित झाल्यानंतर ते प्रेक्षकांची मनं जिंकतात. दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका बॉलिवूड चित्रपटाबाबतही नेमकं असंच घडलं आहे. थिएटरमध्ये फारशी कमाई न करू शकलेला हा चित्रपट आता OTT वर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रोमँटिक थ्रिलर प्रकारातील असून त्यात प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक संघर्ष यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्यामुळे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, दोन महिन्यांनंतर OTT वर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट पाहत आहेत.

OTT वर टॉप ट्रेंडिंगमध्ये

OTT वर रिलीज होताच या रोमँटिक चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांतच चित्रपटाने टॉप ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे, अनेक दिवस ट्रेंडमध्ये असलेल्या ‘धुरंधर 2’लाही या चित्रपटाने मागे टाकलं आहे.

 प्रेम आणि संघर्षाची कथा

या चित्रपटाची कथा दोन इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांभोवती फिरते. शिक्षणादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि स्थिरस्थावर होण्यापूर्वीच लग्न करण्याचा निर्णय घेतात. कमी वयात लग्न, त्यानंतर मूल आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येतात. प्रेम, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यांचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो.

हा चित्रपट म्हणजे ‘चांद मेरा दिल’. दिग्दर्शक विवेक सोनी यांनी या रोमँटिक थ्रिलरचं दिग्दर्शन केलं असून अनन्या पांडे आणि लक्ष्य यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

‘चांद मेरा दिल’ कुठे पाहता येणार?

बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला ‘चांद मेरा दिल’ आता OTT वर प्रदर्शित झाला आहे. 17 जुलै 2026 रोजी हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला. सध्या हा चित्रपट OTT वरील टॉप 10 ट्रेंडिंग यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, ‘प्रीतम अँड पेड्रो’ आणि ‘धुरंधर 2’ यांसारख्या चित्रपटांनाही त्याने लोकप्रियतेच्या शर्यतीत मागे टाकलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *