फक्त एका गुटख्याच्या पुडीसाठी थरार! मध्यरात्रीच बहिणीच्या डोक्यात घातली धारदार कुऱ्हाड, पुण्यात धक्कादायक घटना | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

भाच्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या मामाला रोखणं एका बहिणीला प्रचंड महाग पडलं. रागाच्या भरात सैतान बनलेल्या भावाने थेट आपल्या सख्ख्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने भीषण वार केले.

बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार (प्रतिकात्मक फोटो)
बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार (प्रतिकात्मक फोटो)

पिंपरी चिंचवड : केवळ एका गुटख्याच्या पुडीवरून नात्याला काळिमा फासणारा आणि अंगावर काटा आणणारा रक्ताचा थरार पिंपरी-चिंचवड परिसरात घडला आहे. गुटखा आणला नाही म्हणून भाच्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या मामाला रोखणं एका बहिणीला प्रचंड महाग पडलं. रागाच्या भरात सैतान बनलेल्या भावाने थेट आपल्या सख्ख्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने भीषण वार केले. चिखली येथील मोरे वस्तीत मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

ही धक्कादायक घटना चिखली येथील मोरे वस्ती परिसरात शनिवारी (१३ जून) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रियांका सचिन कदम (वय ३५, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या भावाविरुद्ध खुनी हल्ल्याची फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

नात्याला काळिमा फासणारी घटना…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी संतोष पांडुरंग कांबळे (वय ४२, रा. चिखली) याने त्याचा भाचा रोहन याला दुकानातून गुटख्याची पुडी आणण्यासाठी पाठवले होते. मात्र, रोहन गुटख्याची पुडी न घेताच परत आला. “माझा गुटखा का आणला नाही?” याच एका क्षुल्लक कारणावरून संतोषचा पारा चढला आणि त्याने भाचा रोहन याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

भाऊ आपल्या मुलाला अमानुषपणे मारत असल्याचे पाहून प्रियांका कदम या धावत गेल्या आणि त्यांनी भावाला रोखण्याचा प्रयत्न केला. बहीण या भांडणात मध्ये पडत असल्यातं पाहून आरोपी संतोषचा राग अनावर झाला. त्याने बहिणीला “तुला काय करायचे आहे?” असे जोरात ओरडून म्हणत, घरात असलेली धारदार कुऱ्हाड उचलली आणि थेट प्रियांका यांच्या डोक्यात मारली.

या भीषण हल्ल्यात प्रियांका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिखली पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संतोष कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/

फक्त एका गुटख्याच्या पुडीसाठी थरार! मध्यरात्रीच बहिणीच्या डोक्यात घातली धारदार कुऱ्हाड, पुण्यात धक्कादायक घटना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *