OnePlus लवकरच करणार धमाका! भारतात आणतेय सर्वात स्वस्त फोन, न्यू n सीरीजसह नवी तयारी | टेक्नोलॉजी मराठी बातम्या


Last Updated:

OnePlus N सीरीज ही भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन लॉन्च करेल. याची किंमत 20 हजार रुपयांहून कमी असू शकते.

वनप्लस सीरीज
वनप्लस सीरीज

मुंबई : OnePlus भारतातील काही न्यू स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याचं नाव वनप्लस एन सीरीज आहे. कंपनीची ही न्यू एंट्री लेव्हल सीरीज आहे. याच्या हँडसेटचे नाव वनप्लस एनसह सुरू होतील. या सेगमेंट अंतर्गत कंपनी 20 हजार रुपयांहून कमी किंमतीचे स्मार्टफोन लॉन्च करेल. चला याच्या डिटेल्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus N सीरीजची स्पर्धा भारतीय मोबाईल बाजारात रेडमी, रियलमी, पोको आणि विवोच्या स्मार्टफोनसह होईल. वनप्लसच्या या नवीन सीरीजच्या हँडसेटला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियामधून सेल केलं जाईल.

OnePlus च्या ऑफिशियल पोर्टलवर पोस्ट 

Oneplus च्या ऑफिशियल पोर्टलवर या हँडसेटविषयी एक टीझर जारी केलाय. ज्यात कंपनीने कमिंग सून लिहिलंय. खरंतर आतापर्यंत कोणत्याही ऑफिशियल डेटची घोषणा करण्यात आलेली नाही आणि कोणत्याही टाइम लाइनचा उल्लेखही केला गेला नाही.

OnePlus N6 नावाने प्रोडक्ट लॉन्च होईल 

जीएसएमअरेनाच्या रिपोर्टनुसार, वनप्लस एन6 नावाचा स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. खरंतर आतापर्यंत कॅमेरा आणि स्पेसिफिकेशन्सविषयी कोणतेही डिटेल्स शेअर करण्यात आलेले नाही.

OnePlus Nord सीरीजचं काय होईल?

आता प्रश्न उपस्थित होतो की, OnePlus Nord सीरीजचं काय होईल. खरंतर वनप्लसने नुकतीच OnePlus Nord 6, Nord CE6 आणि Nord CE6 Lite लॉन्च केली होती. हे वनप्लसच्या परवडणाऱ्या सेगमेंटचे फोन आहेत.

रिपोर्ट्सनुसार, वनप्लस एन सीरीजच्या हँडसेटला अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या आधी लॉन्च केलं जाऊ शकतं. या हँडसेटला प्राइम डे सेल दरम्यान विकलं जाईल. खरंतर आतापर्यंत कंपनीने याविषयी जास्त डिटेल्स ऑफिशियली शेअर केलेले नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *