Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार


Pandharpur Accident Update: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात रविवारी ( 14 जून 2026 ) तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर(Tandulwadi Accident)संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. म्हसवड-पंढरपूर रस्त्यावर विहिरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातात पंढरपुरातील आठ जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सर्वांवर सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, आठ जणांच्या मृत्यूला सरकारचा दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार सतीश पाटलांनी Satej Patil) केलाय. नाशिक जिल्ह्यातील घटनेनंतर सरकारने घेतलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींबाबतच्या धोरणात्मक निर्णयाची काय झाले? असा सवालही त्यांनी केलाय.

Pandharpur Accident:नेमका अपघात झाला कसा?

पंढरपूर तालुक्यातील म्हसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा तांदूळवाडी गावाजवळ रविवारी भीषण अपघात झाला. म्हसवड पंढरपूर मार्गावरील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेला खोल विहिरीत जाऊन कोसळली. या गाडीत लहान मुलांसह एकूण 14 प्रवासी होते. गाड़ी विहिरीत पडल्याचा मोठा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केलं. जाहिरातून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, दूर्देवाने 8 जणांचा नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला.  या दुर्घटनेत तीन माय-लेकरांसह एका आजीचा जीव गेला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्घटनेने बावचे आणि साकोरे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला पत्नी, मुलं आणि आई गमावल्याचे दुःख, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Pandharpur Accident Update:अंत्यसंस्कार झालेल्यांची नावे

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये पूजा अमोल साकोरे (23) आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा आरव अमोल साकोरे, पूजा बालाजी बावचे (27) आणि तिचा अवघ्या सहा महिन्यांचा मुलगा समर्थ बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे (27), तिची जुळी मुलं संस्कार संदीप बावचे (14) आणि संस्कृती संदीप बावचे (14) तसेच इंदुबाई दशरथ बावचे (60) यांचा समावेश आहे. या अपघातात तीन माय-लेकरांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सहा महिन्यांच्या चिमुकल्या समर्थपासून ते 14 वर्षांच्या जुळ्या भावंडांपर्यंत अनेक निष्पाप जीव या दुर्घटनेत गेले. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पंढरपूर आणि माळशिरस पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. विहिरीतून मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यासाठी तात्काळ अग्निशामक दलाची यंत्रणा आणि क्रेन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने प्रथम पिकअप जीप विहिरीबाहेर काढण्यात आली, त्यानंतर बचाव पथकाने विहिरीत उतरून सर्व 8 मृतदेह बाहेर काढले.

Pandharpur Accident:8 जणांच्या मृत्यूला सरकार कारणीभूत; आमदार सतेज पाटलांचा आरोप

दरम्यान, या दुर्घटनेनंतर सरकारच्या निष्काळजीपणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यात अशाच प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरींचा सर्वेक्षण करून त्यांना कठडे बांधणे किंवा अशा विहिरी बुजवण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय जाहीर केला होता. मात्र त्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सोलापूर जिल्ह्यात पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांच्या  झालेल्या मृत्यूवरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दुःख व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. काही महिन्यापूर्वी नाशिक मध्ये अशाच पद्धतीची घटना घडल्यानंतर सरकारने अशा विहिरी बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन कुठे कुठे अशा विहिरी आहेत हे तपासले जाईल आणि त्याबाबत अशा विहिरीना कठडा बांधणेसाठी सक्ती केली जाईल किंवा त्या विहिरी मुजवली जातील अशी घोषणा केली होती. परंतु या घटनेला अजून वर्षे पूर्ण होत नाही तोवर अशाच पद्धतीची घटना सोलापूर जिल्ह्यात घडते आणि त्यामध्ये आठ जणांचा जीव जातो हे दुर्दैवी आहे. या आठ जणांच्या मृत्यूला सरकारचे हे दुर्लक्ष कारणीभूत आहे असं सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *