Deool Band 2: ‘देऊळ बंद 2’ सिनेमाचा नाद करायचा नाय; चौथ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई, रविवारचं कलेक्शन किती?


Deool Band 2: मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमानं धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी क्रेझ काही कमी झालेली नाही. या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका असून, त्यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारून प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.  ‘देऊळ बंद 2’ सिनेमाला प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. चौथ्या आठवड्यातही या सिनेमानं जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असली तरी, चौथ्या रविवारी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. 

चौथ्या रविवारी ‘देऊळ बंद 2’ सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? (Deool Band 2 Day 25 Box Office Collection)

चौथ्या रविवारी या सिनेमानं शनिवारच्या तुलनेत जबरदस्त कमाई केली आहे. चौथ्या शनिवारी म्हणजेच  24 व्या दिवशी या सिनेमानं 1.40 कोटींचे कलेक्शन केले आहे.  एकूण 816 शोज पार पडले होते. यातून या सिनेमानं इतक्या कोटीचे कलेक्शन केले. तर, 25 व्या दिवशी या सिनेमानं 24 व्या दिवसाच्या तुलनेत उत्तम कमाई केली आहे. 25 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या रविवारी या सिनेमानं 1.80 कोटींचे कलेक्शन केले आहे. 

शनिवारच्या तुलनेत रविवारी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली आहे. 1.80 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करुन या सिनेमानं जबरदस्त कामगिरी केली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार,  चौथ्या रविवारी या शोचे 864  शोज पार पडले होते.  864 शोजमधून या सिनेमानं  1.80 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. आतापर्यंत या सिनेमानं भारतात 68.22 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. 

 

प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन जोशी अभिनीत  ‘देऊळ बंद 2’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमानं दमदार कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  तिसरा आणि चौथ्या आठवड्यात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.  हा सिमेमा लवकरच  80 कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘देऊळ बंद 2’ सिनेमाचा दबदबा कायम; चौथ्या आठवड्यातही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी, शनिवारी किती कोटी कमावले?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *