धक्कादायक! विहिरीत आडव्या बोरच्या ड्रिलचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, बीडमध्ये दोन मजुरांचा मृत्यू 


Beed : बीडच्या माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. जय महेश साखर कारखाना आवारामध्ये विहिरीत आडव्या बोरच्या ड्रिलिंग चे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव शिवारामध्ये महेश साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या आवारात विहिरीत आडवे बोर घेतले जात होते. यासाठी परप्रांतीय मजूर काम करत होते. हे काम सुरू असताना काही साहित्य विहिरीच्या तळाशी घेऊन जात असताना दुर्घटना घडली आणि यामध्ये दोन मजुरांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाला असून त्यांना माजलगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नाशिकच्या येवला तालुक्यात सलग दोन दिवसांपासून वादळी पाऊस, दोन वृद्ध महिला व एक लहान मुलगा जखमी

नाशिकच्या येवला तालुक्यात सलग दोन दिवसांपासून अवकाळी व वादळी पावसाने हजेरी लावली. आज सायंकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका घराचे छत कोसळून दोन वृद्ध महिला व एक लहान मुलगा जखमी झाला. या जखमींवर अंदरसुल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीने व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचाराचा खर्च व शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले.

दापोली तालुक्यातील गव्हे येथील तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू 

दापोली तालुक्यातील मुरुड येथें गव्हे ब्राह्मणवाडी येथील संकेत हरिश्चंद्र पवार (वय 34) या तरुणाचा वीजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गव्हे गावावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संकेत पवार हे गेली अनेक वर्षे वीज वितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडे काम करत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात कामासाठी गेले होते. वीजेच्या पोलवर चढून काम सुरू असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. यात ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *