डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन


मुंबई : राजधानी मुंबई, कोकण आणि पुण्यातही गेल्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार (Rain) पाऊस पडला असून लोणावळ्यातही (Pune) धो धो पाऊस कोसळला. त्यामुळे, लोणावळा भागातील काही ठिकाणी, रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे, दोन दिवसांपूर्वी रेल्वेसेवा (Railway) विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, अद्यापही पावसामुळे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतूक सुरळीत करण्याचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे. त्याच, पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना प्रवासाचे नियोजन करता यावे, यासाठी मध्य रेल्वेने 10 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत अनेक नियमित तसेच विशेष एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोणावळा–कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तीनही रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर काम सुरू असले तरी मोठ्या प्रमाणावरील नुकसान आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे दुरुस्तीला वेळ लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना प्रवासाचे नियोजन करता यावे, यासाठी मध्य रेल्वेने 10 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत अनेक नियमित तसेच विशेष एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे–सीएसएमटी इंटरसिटी, सीएसएमटी–हैदराबाद एक्स्प्रेस, हुबळी–दादर एक्स्प्रेस, दौंड–इंदूर एक्स्प्रेस आणि चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेस, दादर–सातारा, दादर–साईनगर शिर्डी या गाड्याही विविध तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत.

ठराविक तारखेला लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

याशिवाय सीएसएमटी–गोरखपूर, पुणे–गोरखपूर, पुणे–गाझीपूर सिटी आणि पुणे–हजरत निजामुद्दीन या विशेष गाड्याही संबंधित तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत.

रेल्वे हेल्पलाईन अॅपवर माहिती घ्या

दरम्यान, प्रवाशांनी गाडीच्या धावण्याबाबतची माहिती रेल्वे हेल्पलाइन किंवा NTES ॲपवर तपासावी, तसेच मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवरील अद्ययावत माहितीचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *