England vs India 4th T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज ब्रिस्टलच्या काउंटी ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच 0-2 ने पिछाडीवर असून, मालिका जिवंत ठेवायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे टीम इंडियासाठी अत्यावश्यक आहे. दुसरीकडे, इंग्लंडचे लक्ष्य तब्बल 12 वर्षांनंतर भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याचे आहे. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली असून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने नाणेफेक जिंकली
भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. श्रेयस अय्यरने जाहीर केले की वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा दुखापतीमुळे खेळत नाहीत. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
Here’s a look at #TeamIndia‘s Playing XI for the 4️⃣th T20I 🙌
Updates ▶️ https://t.co/vKZQwVKyYP #ENGvIND pic.twitter.com/0PUFUE2V0s
— BCCI (@BCCI) July 9, 2026
इंग्लंड संघाची प्लेइंग-11 : फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.
ब्रिस्टलच्या काउंटी ग्राऊंडवर 8 वर्षांनी सामना
भारतीय संघ तब्बल आठ वर्षांनंतर ब्रिस्टलच्या काउंटी ग्राऊंडवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताने या मैदानावर 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव टी-20 सामना खेळला होता. त्या लढतीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 बाद 198 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, रोहित शर्माने शानदार शतक झळकावत भारताला दमदार विजय मिळवून दिला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड हेड-टू-हेड रेकॉर्ड
2007 मधील त्या ऐतिहासिक सामन्यापासून हे दोन संघ एकूण 33 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 14 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही संघांमध्ये 12 सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने फक्त 4 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 7 सामन्यांत बाजी मारली आहे.
हे ही वाचा –