Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव


Om Bhutkar Wedding: मराठी मनोरंजन सृष्टीतील ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता ओम भूतकर (Om Bhutkar) लग्नाच्या बेडीत अडकलाय. बायको सोबतचा पहिला फोटो समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आनंदाचा धक्का बसलाय. ओम भुतकरचे नवरदेवाच्या वेशातील काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. डोक्यावर फेटा अन् गळ्यात वरमाला असलेले फोटो असून नवरीनं गुजराती साडी परिधान केल्याचं दिसत आहे.

मित्रांच्या पोस्टमुळे समोर आली आनंदाची बातमी

ओम भूतकरच्या लग्नाची माहिती त्याच्या मित्रांच्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर आली. अभिनेता अभय महाजनने इन्स्टाग्राम स्टोरीवर ओमचा नवरदेवाच्या वेशातील फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या फोटोत ओमने पारंपरिक शेरवानी, डोक्यावर फेटा आणि गळ्यात वरमाला घातलेली दिसते. नववधूने पारंपरिक गुजराती पद्धतीची साडी नेसल्याचं पाहायला मिळत असून, दोघांचाही साधेपणा चाहत्यांना भावला आहे. अभिनेता आलोक राजवाडेही या लग्नसोहळ्यात उपस्थित असल्याचं फोटोंमधून दिसून येत आहे.

 

 

View this post on Instagram

 

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून ओमवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी “नव्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा”, “सुंदर जोडी”, “आयुष्यभर आनंदी राहा” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ओमने आपल्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच कमी बोलणं पसंत केलं आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची बातमी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरली.

अभिनयातून वेगळी ओळख निर्माण

ओम भूतकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी कलाकारांपैकी एक मानला जातो. मुळशी पॅटर्न’मधील राहुल या भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने ‘रावरंभा’, ‘जिंदगी विराट’, ‘बारायण’, ‘नाळ’, ‘नाळ २’, ‘आता थांबायचं नाय’, ‘तुंबाडची मंजुळा’ आणि ‘देऊळ बंद २’ अशा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली. अभिनयासोबतच त्याचा ‘सुखन’ हा उर्दू गझल आणि शायरीवर आधारित कार्यक्रमही रसिकांमध्ये लोकप्रिय आहे.

‘मुळशी पॅटर्न 2’चीही उत्सुकता

दरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न 2’ची घोषणा केल्यापासून या चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. पहिल्या भागात आपल्या अभिनयाने छाप पाडणारा ओम या सिक्वेलमध्ये पुन्हा झळकणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या मात्र ओम भूतकरच्या लग्नाचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, त्याच्या नव्या आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *