काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, राज्यात ऑपरेशन टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरनंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून मात्र ऑपरेशन तुतारीचं खंडण करण्यात आलं आहे. आमचा एकही आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जाणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे. ‘शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते. पवारांचे खासदार अस्वस्थ आहेत, पण ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही’ असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला आहे, या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिंदे , चव्हाण भेट
दरम्यान बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आता एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटं चर्चा झाली. या भेटीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.