क्राईम पेट्रोलचा सगळ्यात थरारक एपिसोड, मराठी कलाकारांनी गाजवला, युट्युबवर 25M लोकांनी पाहिला! | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Crime Patrol Most Thrilling Episdoe : क्राइम पेट्रोलचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड तुम्ही पाहिलाय का? मराठी कलाकारांनी गाजवलाय हा एपिसोड.

News18
News18

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या शोपैकी एक शो म्हणजे क्राइम पेट्रोल. अनेक नाट्यरूपांतर त्याचबरोबर सत्य घटनांवर आधारित स्टोरी या शोमध्ये दाखवले जायचे. आजच्या सस्पेन्स थ्रीलर फिल्म आणि वेब सीरिज क्राइम पेट्रोलसमोर फिक्या पडतील इतका सस्पेन्स या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असायचा जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवायचा.

क्राइम पेट्रोलच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड तुम्हाला माहिती आहे आहे. विशेष म्हणजे या एपिसोडमध्ये अनेक मराठी कलाकार आहेत.  क्राइम पेट्रोलचा हा एपिसोड तब्बल 25 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.  एका नामवंत वकिलाचा छळ, विवाहबाह्य संबंध आणि स्वतःवरच घडवून आणलेला प्राणघातक हल्ला अशी या एपिसोडची स्टोरी आहे. जे शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

कथेची सुरुवात एका ‘गोखले’ ( लोकेश गुप्ते ) नावाच्या एका मोठ्या वकिलापासून होते. गोखले हा दिसायला प्रतिष्ठित असला तरी त्याचे त्याच्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांशी अनैतिक संबंध असतात. त्याची ‘रश्मी’ नावाची असिस्टंट त्याच्या प्रेमात पडते आणि पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणू लागते. गोखलेची पत्नी ( खुशबू तावडे ) अत्यंत सुसंस्कृत असून ती एक अनाथ आश्रम चालवत असते. पत्नी इतकी चांगली असूनही गोखले तिला अत्यंत वाईट वागणूक देत असतो.

एक दिवस गोखले बाहेर जात असताना काही अज्ञात गुंड त्याच्यावर प्राणघातक हल्ला करतात. या हल्ल्यातून गोखले थोडक्यात वाचतो. मात्र तिथे उभा असलेल्या एका निष्पाप महिलेला गोळी लागते. तिच्या 4 वर्षांच्या चिमुरड्या मुलीसमोरच त्या महिलेचा जागीच मृत्यू होतो. या हाय-प्रोफाईल केसनंतर पोलीस तात्काळ तपास सुरू करतात. सुरुवातीला पोलिसांचा संशय गोखलेच्या पत्नीवर आणि तिच्यावर कॉलेजच्या दिवसांपासून प्रेम करणाऱ्या ‘सार्थक’ ( हार्दीक जोशी ) नावाच्या तरुणावर जातो.

तपासादरम्यान पोलिसांना समजते की, रश्मीच्या आधी पल्लवी नावाची दुसरी सेक्रेटरी गोखलेसोबत काम करत होती. गोखले पोलिसांना सांगतो की, पल्लवीनेच त्याला जाळ्यात ओढले आणि नंतर ब्लॅकमेल करू लागली, म्हणून तिचे लायसन्स रद्द करून तिला नोकरीवरून काढले. मात्र जेव्हा पोलीस पल्लवीला ताब्यात घेतात तेव्हा एक वेगळेच सत्य समोर येतं. गोखलेनेच पल्लवीला गुंगीचे औषध देऊन तिचा गैरफायदा घेतला होता आणि नंतर खोट्या केसमध्ये अडकवून तिची वकिलीची सनद रद्द केली होती, असा खळबळजनक खुलासा पल्लवी करते.

पल्लवी मीडियासमोर जाऊन गोखलेचा खरा चेहरा उघड करणार असते. या भीतीपोटी गोखले एक भयंकर कट रचतो. पल्लवीला कायमचे जेलमध्ये टाकण्यासाठी तो स्वतःवरच गुंडांकरून हल्ला करून घेतो जेणेकरून संशयाची सुई पल्लवीकडे जाईल. मात्र पोलिसांनी मुख्य शूटरला अटक करताच गोखलेचा हा डाव उघ़डा पडतो. त्यानेच हा कट रचल्याचं सिद्ध होतं आणि वकील जेलमध्ये जातो.

घटनेनंतर वकिलाची पत्नी त्याला घटस्फोट देते. ज्या निष्पाप महिलेचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता तिच्या 4 वर्षांच्या अनाथ मुलीला ती आपल्या अनाथ आश्रमात आणते. तिला आईचे प्रेम देऊन तिच्यासोबत एका नव्या आणि सुंदर आयुष्याची सुरुवात करते.

मराठी बातम्या/मनोरंजन/

क्राईम पेट्रोलचा सगळ्यात थरारक एपिसोड, मराठी कलाकारांनी गाजवला, युट्युबवर 25M लोकांनी पाहिला!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *