अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून चाललेला तणाव निवळत असल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. याच पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीचा आपल्याला काही फायदा होईल का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात प्रामुख्याने निर्माण झाला आहे. आज भारतात पेट्रोल – डिझेलचे दर कमी झालेत का ? असाही प्रश्न अनेकांना पडला. गुरूवार, 18 जून रोजी सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. या तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर बदललेले नाहीत.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
फेब्रुवारी अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केल्यावर इराणनेही प्रत्युत्तर दिल आणि सुरू झाला अविरत संघर्ष, युद्ध. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली होती, परंतु शांतता कराराची बातमी येताच त्यामध्ये एक टक्क्याहून अधिक घट झाली. गुरुवारी सकाळी ‘ब्रेंट क्रूड’चा भाव 1.04 टक्क्यांनी (0.83 डॉलर्स) घसरून 78.72 डॉलर्स प्रति बॅरलवर आला, तर ‘डब्ल्यूटीआय’ (WTI) क्रूडचा भावही 1.26 टक्क्यांनी घसरून 75.82 डॉलर्स प्रति बॅरल झाला.
तेल कंपन्यांना कोट्यवधींचं नुकसान
क्रूड ऑईलच्या किमतीत घट होऊनही भारतात इंधनाचे दर कमी झालेले नाहीत, त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तेल कंपन्यांना होणारे प्रचंड नुकसान हे आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांच्या मते, सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 3 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 27 रुपये, इतका तोटा अजूनही सहन करावा लागत आहे. परिणामी, या कंपन्यांना दररोज सुमारे 600 कोटी रुपयांचा तोटा होत आहे.
तरीही, दिलासादायक बाब म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी पेट्रोलवर हे नुकसान प्रति लिटर 24 रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर 105 रुपये इतकं होते. 18 मे पर्यंत कंपन्यांचे दैनंदिन नुकसान 750 कोटी रुपयांच्या पातळीवर होते; आंतरराष्ट्रीय बाजारात किमती काहीशा कमी झाल्यामुळे या आकड्यात आता थोडी घट झाली आहे.
देशातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल -डिझेलचे भाव
देशांतर्गत तेल कंपन्यांनी 18 जून 2026 साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मोठ्या महानगरांपासून ते लहान शहरांपर्यंत सर्वच ठिकाणी हे दर स्थिर आहेत.
असे चेक करा तुमच्या शहरातील भाव
जर तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे लेटेस्ट दर घरबसल्या जाणून घ्यायचे असतील, तर तशी सुविधाही उपलब्ध आहे. इंडियन ऑईलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर “RSP