विजय देवरकोंडासह क्रिकेटर Tilak Varma ला कायदेशीर नोटीस! DSP मोहम्मद सिराजवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Telangana Cricket Association sends legal notices : हैदराबाद क्रिकेट एसोसिएशन म्हणजेच तेलंगाना क्रिकेट एसोसिएशनच्या एका क्रिकेट स्पर्धेमुळे या सर्वांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार निर्माण झालीय.

TCA sends legal notices to tilak varma siraj
TCA sends legal notices to tilak varma siraj

TCA sends legal notices to tilak varma siraj : इंडिया ए चा कर्णधार तिलक वर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सिरीजमध्ये तिलकने आपल्या दमदार कामगिरीचं प्रदर्शन देखील केलंय. अशातच आता त्याला मोठा धक्का बसला आहे. तिलक वर्माला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलीये. फक्त तिलक वर्माच नाही तर टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद सिराज याच्यासह अंबाती रायडू याला देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

तिलक वर्मा अन् मोहम्मद सिराज यांना नोटीस

तेलंगाना क्रिकेट एसोसिएशन म्हणजेच TCA ने थेट टीम इंडियाचे स्टार खेळाडू तिलक वर्मा, मोहम्मद सिराज आणि अंबाती रायुडू यांना नोटीस पाठवली आहे. केवळ क्रिकेटर्सच नव्हे, तर या नोटीसमध्ये फिल्म स्टार विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. हैदराबाद क्रिकेट एसोसिएशन म्हणजेच तेलंगाना क्रिकेट एसोसिएशनच्या एका क्रिकेट स्पर्धेमुळे या सर्वांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार निर्माण झालीय.

TG20 लीग बीसीसीआयच्या मान्यतेशिवाय सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद क्रिकेट एसोसिएशन ही संस्था BCCI च्या अधिकृत मंजुरीशिवाय अनेक कॉर्पोरेट कंपन्यांसोबत मोठा बिझनेस करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या असोसिएशनची TG20 लीग ही देखील बीसीसीआयच्या मान्यतेशिवाय सुरू आहे. अशा अनधिकृत लीगचा मॅच किंवा स्पर्धेसाठी थेट प्रचार करणं हा एक मोठा गुन्हा मानला जातो, असं या कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे.

DSP सिराजच्या अडचणी वाढल्या

दरम्यान, बीसीसीआयची मान्यता नसताना ही लीग सुरू करण्यात आली होती. त्याच स्टार खेळाडूंची आणि सेलिब्रेटिंचा समावेश होता. त्यामुळे आता हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनने तातडीची कारवाई केली आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणावर हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनने संबंधित अभिनेते आणि खेळाडूंकडून तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास किंवा आवश्यक वाटल्यास पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, असा कडक इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता तिलक वर्मासह DSP सिराजच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

विजय देवरकोंडासह क्रिकेटर Tilak Varma ला कायदेशीर नोटीस! DSP मोहम्मद सिराजवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *