पुण्यातील चार्टर विमानात कोण कोण, धक्कादायक माहिती पुढे, 6 खासदारांसोबत थेट.. सुषमा अंधारेंच्या दावा.. – Marathi News | Shiv Sena leader Sushma Andhare has revealed the names of those who arrived in Pune via chartered flight


शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत आहे. शिवसेनेचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे हे 6 खासदार दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून हे खासदार स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र देणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून मोठे आरोप करण्यात आली. संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधत आरोपे केले. 6 खासदार जर ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर हा धक्का आहे. शिवसेनेकडून याच पार्श्वभूमीवर व्हिप जारी करण्यात आले. ज्यापूर्वी घडामोडींना वेग आले. सर्व खासदारांनी या बैठकीत सहभागी व्हावे, असे आव्हान करण्यात आलंय. तब्बल 6 खासदार ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागल्याची सूत्रांची माहिती आहे.

याचदरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कालच्या विमानात नक्की कोण कोण होते हे देखील सांगितले. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, काल रात्री पुण्यात चार्टर आल, तानाजी सावंत त्याला लिड करत होते नानासाहेब पाटील, अमित क्षिरसागर, जयराजे क्षीरसागर आणि ओमराजे निंबाळकर यामध्ये होते. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बोलावं तेवढं थोडच आहे..

आष्टीकर यांनी परवा रात्री मला फोन केलेला… नागेश पाटील लोकांना वेड्या काढत आहेत. नागेश पाटील बैमानी करणार हे समजत असून सुद्धा पक्ष नेतृत्वाने मला मतांसाठी फोन करायचं सांगितलं. किती ओव्हर स्मार्ट पणा दाखवा.
याला क्रांती म्हणत नाही याला चापलुसी म्हणतात. पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटले की, जिकडे गुलाल तिकडं चांगभलं म्हणणारे ग्रस्थ…साईबाबाची चार वेळा शपथ घेणारे…. संजय दिना पाटील.

मशालीवर मिळालेलं हे मतदान होतं…शिवसैनिकाला पूर्ण अधिकार आहे यांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारण्याचा ‌.. शिवसैनिकांनी घरात घुसून जाब विचारला पाहिजे… भाजपा मध्ये ऐपत नाही स्वतः चे नेते बनवायला… ओमराजे निंबाळकर कधी माझे फोन उचलत नाही. कैलास पाटील म्हणाले, मी फक्त माझी गॅरंटी देऊ शकतो दुसऱ्याची नाही त्यांच्या बोलण्यातही संध्गिनता आहे. तानाजी सावंत दिल्लीमध्ये जाताना त्यांच्यासोबत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *