Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट


Vidhan Parishad Election 2026: जळगाव विधान परिषद निवडणुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणूक मतदानसाठी (Vidhan Parishad Election 2026) अवघे काही तास बाकी असताना, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपली निवडणुकीतून (Jalgaon MLC Election 2026) अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला फोन केल्याने आपण थांबण्याचा निर्णय घेतला असल्याच अनिल चौधरी यांनी म्हटले आहे. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपली माघार घेतली असल्याने महायुतीचे नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित झाल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे. (Jalgaon Vidhan Parishad Election 2026) 

Anil Chaudhary: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांचा मान ठेवून मी थांबलो

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांचा मान ठेवून मी थांबलो. लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही अनिल चौधरी यांनी माहिती दिली. मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय होतो. ते माझे मोठे बंधू आहेत. परंतु त्यांनी आशीर्वाद दिला नाही, त्यांनी मला आशीर्वाद दिला असता तर कदाचित मी आज आमदार राहिलो असतो, अशी सल देखील अनिल चौधरी यांनी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे मला फोन आले होते आणि त्यानुसार आपण युती धर्माचे आणि नंदकिशोर महाजन यांच्या मैत्री खातर आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचेही ते म्हणाले.

Vidhan Parishad Election 2026: मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज, सर्व बाबीवर करडी नजर

दुसरीकडे जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात सात मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यात 630 मतदार हे विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात तीनशे पंधरा महिला आणि तेवढेच पुरुष मतदार आहेत. मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच व्हिडिओग्राफी तसेच वेब कास्टिंग केलं जाणार असून सर्व बाबीवर करडी नजर राहणार आहे.

जळगाव पक्षीय बलाबल (Jalgaon Vidhan Parishad Election 2026) 

भाजपा – 248 
शिवसेना शिंदे – 179
शिवसेना ठाकरे गट – 9
काँग्रेस – 21 
राष्ट्रवादी शरद पवार गट – 28 
राष्ट्रवादी अजित पवार गट – 35 
एम आय एम – 3
अपक्ष – 53 

महायुती 432 काय 
महाविकास आघाडी 58

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *