Ravikant Tupkar Protest : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा (18 जून) चौथा दिवस असून रात्री तुपकरांची तब्येत खालवाल्याने तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होत. डॉक्टरांच्या अहवालनुसार तुपकर यांच्या शरीरातील साखरेच प्रमाण हे अतिशय कमी झालं असून त्यामुळे त्यांच्या किडनीवर ही परिणाम झालाय. मात्र रविकांत तुपकर माघार घ्यायला तयार नसल्याने आता शासनाने तात्काळ उपोषणाची दखल घेऊन निर्णय घ्यावा या मागणीसाठी शेतकरी व कार्यकर्ते आक्रमक बघायला मिळत आहेत. जिल्ह्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी तुपकरांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन होत असून आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तीव्र होण्याची चिन्ह आहेत. (Ravikant Tupkar Hunger Strike)
Washim News : अकोला-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून तीव्र आंदोलन
दुसरीकडे, वाशिममध्ये रविकांत तुपकर यांच्या प्रकृती खालावल्याने शेतकऱ्यांचा संताप बघायला मिळत आहे. वाशिममध्ये अकोला-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून तीव्र आंदोलन करण्यात आलंय. बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करत असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. परिणामी वाशिम येथे संतप्त कार्यकर्त्यांनी अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देत हे आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद