Jennifer Winget Married: 41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल


Jennifer Winget Second Marriage News: अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटच्या (Jennifer Winget) आयुष्यात नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. तिनं नुकतंच लग्न केलं आहे. अभिनेत्रीने युकेमध्ये सिंगापूरचे उद्योगपती विल्यम इश्माएलशी   यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांचा विवाहसोहळा अगदी खासगी पद्धतीने पार पडला.  माहितीनुसार, त्यांच्या लग्नात कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. या जोडप्याने त्यांच्या खासगी लग्नातील झलक सोशल मीडियात शेअर केली आहे. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

जेनिफर आणि विलियमने आपल्या लग्नातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  शनिवारी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटोस शेअर केले आहेत.  अभिनेत्रीने फोटोंचा व्हिडीओ तयार केला आहे.  या फोटोंमध्ये  नवविवाहित जोडपे  चर्चमधून हातात हात घालून बाहेर पडताना दिसत आहे.  तर, मित्र परिवार  त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहेत.  तिनं पोस्टला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे, ‘जस्ट मॅरिड’ असं म्हणत तिनं आपल्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली आहे.  तिनं पोस्टवर ‘अखेरीस आपले तारे जुळून आले…’ , असंही म्हटलं आहे.  सध्या जेनिफरची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

जेनिफर विंगेटनं दुसरं लग्न गुपचूप उरकलं (Jennifer Winget Second Marriage with William Ishmael)

जेनिफरने या खास सोहळ्यात विदआऊट स्ट्रॅप व्हाईट वेडिंग गाऊन परिधान केला होता.  तर, विल्यमने क्रिम रंगाच्या वेस्टकोटसह नेव्ही ब्लू सूट परिधान केला होता.  या क्लासिक लूकमध्ये विलियम खूप सुंदर दिसत होता. त्यांच्या लग्नातील अनेक रोमँटिक फोटोस सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  एका फोटोमध्ये हे रोमँटिक कपल एकमेकांना किस करत असल्याचं दिसत आहे. जेनिफरने तिचा पुष्पगुच्छ हातात धरला होता. तर, विल्यमने तिला आपल्या मिठीत घेतले होते.  

फोटोंसोबत या जोडप्याने सोहळ्यातील खास क्षणांचा एक व्हिडीओ पोस्ट केला.  या व्हिडीओतून खासगी समारंभाची झलक पाहायला मिळत आहे. दरम्यान,  लग्नाची घोषणा न करता जेनिफरने थेट लग्नाचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. तिची पोस्ट व्हायरल होताच तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे चर्चा केली नसली तरी,  त्यांच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दलची चर्चा जून 2026 पासून सुरु होती,  अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न…’, गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *